गोळवलकर रस्त्यावर गंभीर अपघातात महिला ठार
By Admin | Updated: November 22, 2015 23:16 IST2015-11-22T23:16:51+5:302015-11-22T23:16:51+5:30
पुणे : भरधाव जीपची दुचाकीला धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मुलीसमोरच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी एकच्या सुमारास सहकारनगर येथील गोळवलकर रस्त्यावर घडला.

गोळवलकर रस्त्यावर गंभीर अपघातात महिला ठार
प णे : भरधाव जीपची दुचाकीला धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मुलीसमोरच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी एकच्या सुमारास सहकारनगर येथील गोळवलकर रस्त्यावर घडला. ज्योती सचिन साळुंके (वय ४८, रा. तळजाई पठार, धनकवडी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळुंके आणि त्यांची मुलगी दुचाकीवरुन सहकारनगरमधील गजानन महाराज मंदिराच्या दिशेने जात होते. ही दुचाकी साळुंके यांची मुलगी चालवीत होती. गोळवलकर रस्त्यावरील शिंदे हायस्कूलसमोर भरधाव आलेल्या जीपने दुचाकीला समोरुन धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या साळुंके यांना तातडीने ससून रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु त्यांचा उपचारांपुर्वीच मृत्यू झाला होता.