महिलांनी आपला आर्थिक विकास स

By Admin | Updated: March 25, 2015 21:09 IST2015-03-25T21:09:59+5:302015-03-25T21:09:59+5:30

ाधावा : हिरालाल राठोड

Women have their economic development | महिलांनी आपला आर्थिक विकास स

महिलांनी आपला आर्थिक विकास स

ावा : हिरालाल राठोड
दौंड। दि.२५(वार्ताहर)
महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आपला आर्थिक आणि सामाजिक विकास करावा, असे आवाहन राष्ट्रवादी पुरस्कृत महाराष्ट्र प्रदेश बंजारा सेलचे अध्यक्ष हिरालाल राठोड यांनी केले.
गिरीम (ता. दौंड) येथील महात्मा फुले स्वसहाय्यता महिला बचत गटाला लाभांश वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सबलीकरण होत आहे. त्यामुळे महिलांनी बचत गटाची नाळ तोडता कामा नये, याउलट बचत गटाचा आधार घेऊन आपली प्रगती साधावी, असे शेवटी राठोड म्हणाले.
याप्रसंगी महात्मा फुले बचत गट आणि अहिल्यादेवी होळकर शेतकरी बचत गटाचे संस्थापक अध्यक्ष बासूभाई पठाण यांनी दोन्ही संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी श्रीरंग धायगुडे, मच्छिंद्र चव्हाण, तुकाराम बारवकर, तय्यब शेख, तुकाराम मदने, विजू जगताप, दिनकर तरंगे व बचतगटाच्या महिला उपस्थित होत्या.

फोटो ओळ : गिरीम (ता. दौंड) येथे महिलांना लाभांश वाटप करताना हिरालाल राठोड व मान्यवर.

25032015-िं४ल्लि-10

---------------

Web Title: Women have their economic development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.