शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Draupadi Murmu: महिलांनो, सक्रिय होऊन ग्रामपंचायती चालवा, राष्ट्रपतींचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 09:00 IST

Draupadi Murmu: महिलांनी ग्रामपंचायतींच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. त्याचबरोबर पंचायत निवडणुकांबाबत ग्रामस्थांत तंटे होऊ नयेत. शक्यतो सर्व सामुदायिक कामे परस्पर सहमतीने व्हायला हवीत, असे त्या म्हणाल्या. 

नवी दिल्ली : महिलांनी ग्रामपंचायतींच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. त्याचबरोबर पंचायत निवडणुकांबाबत ग्रामस्थांत तंटे होऊ नयेत. शक्यतो सर्व सामुदायिक कामे परस्पर सहमतीने व्हायला हवीत, असे त्या म्हणाल्या. राष्ट्रपतींनी गुजरात सरकारच्या ‘समरस ग्राम योजने’वर प्रकाश टाकला, या योजनेंतर्गत सहमतीच्या आधारे पंचायत प्रतिनिधी निवडणाऱ्या गावांना पुरस्कृत करण्यात येते.

राष्ट्रपतींनी राष्ट्रीय पंचायत प्रोत्साहन अधिवेशनाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्या हस्ते राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुर्मू म्हणाल्या की, कोणत्याही समाजाच्या सर्वांगीण विकासात महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. ‘स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या भल्यासाठी महिलांना अधिकाधिक निर्णय घेण्याचे अधिकार मिळाले पाहिजेत. मी भगिनींना व मुलींना आवाहन करेन की, त्यांनी ग्रामपंचायतीच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ३१.५ लाखांहून अधिक निवडून आलेल्या प्रतिनिधींपैकी ४६ टक्के महिला असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी दर पाच वर्षांनी पंचायत प्रतिनिधी निवडण्याची तरतूद आहे, मात्र या निवडणुकांमुळे कधी कधी लोकांमध्ये कटुता निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीबाबत ग्रामस्थांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, हे लक्षात घेऊन पंचायत निवडणुका राजकीय पक्षांपासून वेगळ्या ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पाच ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार सांगली जिल्ह्यातील खंडोबाची वाडी, कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींना सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  ग्रामपंचायतींमध्ये सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील पाच ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाच्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अलाबाद ग्रामपंचायतीला तृतीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूPresidentराष्ट्राध्यक्षIndiaभारत