नरेंद्र मोदींच्या ताफ्यावर महिलेने फेकली फुलदाणी
By Admin | Updated: February 3, 2016 16:13 IST2016-02-03T16:12:05+5:302016-02-03T16:13:25+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर एका महिलेने बुधवारी दुपारी फुलदाणी फेकल्याची घटना घडली.

नरेंद्र मोदींच्या ताफ्यावर महिलेने फेकली फुलदाणी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर एका महिलेने बुधवारी दुपारी फुलदाणी फेकल्याची घटना घडली.
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, सहिदाबाद येथील एक महिला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी आली असता तिला पंतप्रधान कार्यालयात जाऊ दिले नाही. याचा राग म्हणून या महिलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गाड्यांच्या ताफ्यावर फुलदाणी फेकली. या घटनेनंतर लगेच संसद रस्ता पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्या महिलेला ताब्यात घेतले.
Woman apprehended by police after she threw flower-pot at PM Modi's convoy that had just passed Delhi's Vijay Chowk pic.twitter.com/2BhHgnvOop
— ANI (@ANI_news) February 3, 2016