बॉलीवूडमध्ये महिलाही होणार मेकअप आर्टिस्ट

By Admin | Updated: November 11, 2014 02:36 IST2014-11-11T02:36:04+5:302014-11-11T02:36:04+5:30

फक्त पुरुषांनाच ‘मेकअप आर्टिस्ट’ म्हणून काम करण्याची मुभा देणारा गेली सुमारे सहा दशके लागू असलेला पक्षपाती नियम सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केला

Women in Bollywood make-up artist | बॉलीवूडमध्ये महिलाही होणार मेकअप आर्टिस्ट

बॉलीवूडमध्ये महिलाही होणार मेकअप आर्टिस्ट

नवी दिल्ली : ‘बॉलीवूड’ म्हणून ओळखल्या जाणा:या मुंबईच्या हिंदी चित्रपट सृष्टीत फक्त पुरुषांनाच ‘मेकअप आर्टिस्ट’ म्हणून काम करण्याची मुभा देणारा गेली सुमारे सहा दशके लागू असलेला पक्षपाती नियम सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केल्याने महिलांनाही हे व्यावसायिक क्षेत्र खुले झाले आहे.
‘बॉलीवूड’मधील चित्रपटांच्या चित्रीकरणांच्या वेळी वेशभूषा, रंगभूषा आणि केशभूषा इत्यादी स्वरूपाची कामे करणा:या कलाकारांची ‘सिने कॉस्च्युम, मेकअप आर्टिस्ट्स अँड हेअर ड्रेसर्स असोसिएशन’ ही संघटना     आहे. 
या संघटनेच्या 1955 मध्ये तयार केलेल्या नियमावलीत पुरुष कलाकार फक्त ‘मेकअप आर्टिस्ट’ म्हणून व महिला फक्त ‘हेअर ड्रेसर’ म्हणून काम करू शकतील, अशी तरतूद आहे. त्यावेळी ‘मेकअप आर्टिस्ट’ म्हणून बॉलीवूडमध्ये कोणी महिला काम करीत नव्हत्या व गेल्या सहा दशकांत या कप्पेबंद कामाच्या वाटपास कोणी फारशा गांभीर्याने आक्षेपही घेतला नव्हता.
असोसिएशनने दिलेले सदस्यत्वाचे कार्ड असल्याशिवाय बॉलीवूडमध्ये काम करता येत नाही व ज्या प्रकारचे कार्ड तुमच्याकडे असेल तेच काम तुम्हाला करता येते. अमेरिकेतून शिक्षण घेऊन आलेल्या चारू खुराणा यांना, आपल्या चित्रपटांसाठी ‘मेकअप आर्टिस्ट’ म्हणून काम करू देण्यास, काही नामवंत चित्रपट निर्माते व दिग्दर्शक तयार होते; पण असोसिएशनने त्यांना तसे काम देण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष काम करण्यापासून रोखलेही गेले.
या पक्षपाताविरुद्ध चारू खुराणा यांनी चार वर्षापूर्वी सुरू केलेला लढा आता फलद्रूप झाला आहे. त्यांनी प्रथम राष्ट्रीय महिला आयोगाकडे            दाद मागितली. आयोगाने केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्रलयाच्या मध्यस्तीने यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यातून काही निष्पन्न न झाल्यावर महिला आयोगाने चारू खुराणा यांचे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले.
असा लिंगभेद करणारा पक्षपाती नियम कायदा व राज्यघटनेच्या निकषावर क्षणभरही टिकू शकत नाही. त्यामुळे असोसिएशनने हा नियम स्वत:हून बदलावा, अन्यथा आम्ही तो रद्द करू, असे न्यायालयाने गेल्या आठवडय़ातच स्पष्ट केले                       होते. 
सोमवारी असोसिएशनने, न्यायालयानेच निर्णय द्यावा अशी भूमिका घेतली.  त्यामुळे न्यायालयाने हा पक्षपाती नियम रद्द केला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
पुरुषांनाही मिळाला न्याय
4चारू खुराणा यांच्या या लढय़ाने बॉलीवूडमधील केवळ महिलाच नव्हे, तर पुरुष कलाकारांनाही न्याय मिळाला आहे. कारण न्यायालयाने ‘मेकअप आर्टिस्ट’ म्हणून काम करण्यास महिलांना असलेला मज्जाव दूर करण्याबरोबरच ‘हेअर ड्रेसर’ म्हणून काम करण्याचे, आजवर पुरुषांसाठी निषिद्ध असलेले क्षेत्रही त्यांना खुले केले आहे.
 
4असोसिएशनने पात्र व इच्छुक महिलांना ‘मेकअप आर्टिस्ट’ म्हणून काम करण्यासाठी कार्ड देण्यास सुरुवात करावी आणि ते काम करीत असताना त्यांना इतरांकडून त्रस दिला जाणार नाही, याची पोलिसांनी खात्री करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.
 

 

Web Title: Women in Bollywood make-up artist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.