दिव्याचा भडका उडाल्याने महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: August 10, 2015 23:28 IST2015-08-10T23:28:22+5:302015-08-10T23:28:22+5:30

दिव्याचा भडका उडाल्याने महिलेचा मृत्यू

The woman's death due to lightning flares | दिव्याचा भडका उडाल्याने महिलेचा मृत्यू

दिव्याचा भडका उडाल्याने महिलेचा मृत्यू

व्याचा भडका उडाल्याने महिलेचा मृत्यू
नरखेड : स्वयंपाक करीत असताना दिव्याचा भडका उडाला. यात मोठ्या प्रमाणावर भाजल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोगरा येथे नुकतीच घडली. मयुरी वासुदेव गावंडे (२६, रा. मोगरा, ता. नरखेड) असे मृत महिलेचे नाव आहे. मयुरी ही घरातील चुलीवर स्वयंपाक करीत असताना, रॉकेल तेल भरले असलेल्या दिव्याचा भडका उडाला. यात ती जळाल्याने तिला नागपूर येथील लता मंगेशकर रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. तेथे तिच्यावर २० जुलैपासून उपचार सुरू होते. दरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी नरखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहे.
.....
अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला
नागपूर : देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरबाहुली शिवारात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. ही घटना रविवारी सकाळी ९.३० वाजतादरम्यान उघडकीस आली. मृताचे वय अंदाजे ४० वर्ष असून उंची पाच फुट, सहा इंच, अंगात काळ्या रेघाटी असलेले गुलाबी हाफ शर्ट, खाकी रंगाचा पॅन्ट परिधान केला आहे. सदर वर्णनातील व्यक्तीबाबात कुणालाही माहिती असल्यास देवलापार पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणी फिर्यादी सुनील शांताराम कोडवते (३१, रा. चोरबाहुली) यांच्या तक्रारीवरुन देवलापार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The woman's death due to lightning flares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.