छेडछाडीला विरोध केल्याने महिलेला रेल्वेतून फेकले
By Admin | Updated: October 27, 2014 02:55 IST2014-10-27T02:55:25+5:302014-10-27T02:55:25+5:30
छेडखानीला विरोध करणाऱ्या २६ वर्षीय महिलेला एका तरुणाने धावत्या रेल्वेतून फेकून दिले. उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात शनिवारी ही धक्कादायक व अमानुष घटना झाली.

छेडछाडीला विरोध केल्याने महिलेला रेल्वेतून फेकले
मुजफ्फरनगर : छेडखानीला विरोध करणाऱ्या २६ वर्षीय महिलेला एका तरुणाने धावत्या रेल्वेतून फेकून दिले. उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात शनिवारी ही धक्कादायक व अमानुष घटना झाली. ही महिला गंभीर जखमी झाली असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पीडित महिला आपल्या मित्रांसोबत उत्तराखंडचा दौरा आटोपून रेवाडी येथे जाण्यासाठी अजमेर-हरिद्वार रेल्वेने प्रवास करीत होती. या महिलेसोबत डब्यात बसलेल्या एका तरुणाने आधी तिला छेडले. तसेच तिचे सामान लुटण्याचाही प्रयत्न केला. त्याला या महिलेने विरोध केल्यावर तरुणाने तिला रेल्वेतून बाहेर फेकले. (वृत्तसंस्था)