प्रेमविवाह केला म्हणून महिलेला जाळलं जिवंत

By Admin | Updated: June 24, 2017 12:34 IST2017-06-24T12:34:33+5:302017-06-24T12:34:33+5:30

आपल्या पसंतीच्या तरुणासोबत लग्न करणा-या एका महिलेला तिच्याच कुटुंबीयांनी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

The woman was burnt alive as a woman in love marriage | प्रेमविवाह केला म्हणून महिलेला जाळलं जिवंत

प्रेमविवाह केला म्हणून महिलेला जाळलं जिवंत

ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 24 - उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे. आपल्या पसंतीच्या तरुणासोबत लग्न करणा-या एका महिलेला तिच्याच कुटुंबीयांनी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 
 
या घटनेत पीडित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पीडित महिलेला जिवंत मरत असताना पाहून नंणदेनं तिला वाचवण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला.  या प्रयत्नात तीदेखील जखमी झाली आहे. गुल्फशा असे मृत महिलेचं नाव आहे. 
 
मुरादाबादचे पोलीस अधीक्षक आशिष श्रीवास्तव यांनी सांगितले की, एका आरोपीला घटनास्थळावरुन अटक करण्यात आले आहे. तर आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी गुल्फशानं शेजारी राहणा-या साकिबसोबत प्रेमविवाह केला. गावापासून जवळपास दोन मीटर अंतरावर या दोघांचं घर होते. 
 
आंतरजातीय विवाह केल्यानं नाराज झालेल्या गुल्फशाच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरी जाऊन तिला जिवंत जाळलं. तर यापूर्वीही गुल्फशावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप तिच्या सासरच्या मंडळीनी केला आहे. 
दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

Web Title: The woman was burnt alive as a woman in love marriage