शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पती आंघोळ करत नाही, दुर्गंधी येतेय... लग्नाच्या ४० दिवसानंतर महिलेनं मागितला घटस्फोट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 13:13 IST

महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा नवरा महिन्यातून फक्त एक किंवा दोनदाच आंघोळ करतो, त्यामुळं त्याच्या अंगातून उग्र वास येतो.

पती-पत्नीमध्ये अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असतात. अनेकवेळा परिस्थिती अशी बनते की, वाद वेळीच सोडवले नाहीत तर नाते तुटण्यापर्यंत मजल जाते. मात्र, उत्तर प्रदेशातून एक अशी बातमी समोर आली आहे, जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. पतीच्या स्वच्छ न राहण्याच्या सवयीला एक महिला इतकी कंटाळली की, तिनं लग्नाच्या ४० दिवसांनंतरच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. 

महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा नवरा महिन्यातून फक्त एक किंवा दोनदाच आंघोळ करतो, त्यामुळं त्याच्या अंगातून उग्र वास येतो. याच कारणामुळं तिला आता त्याच्यापासून घटस्फोट हवा आहे. आग्रा येथील महिलेनं कौटुंबिक समुपदेशन केंद्राशी संपर्क साधला आणि सांगितलं की, ती यापुढे तिच्या पतीसोबत अस्वच्छतेमुळे राहू शकत नाही. चौकशीदरम्यान महिलेच्या पतीनेही आपल्या आंघोळीची सवय कबूल केली. त्यानं सांगितलं की, तो महिन्यातून एकदा किंवा दोनदाच आंघोळ करतो आणि आठवड्यातून एकदा स्वतःवर गंगाजल शिंपडतो. 

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, संबंधित पतीनं लग्न झाल्यानंतर ४० दिवसांत पत्नीच्या विनंतीवरून फक्त सहा वेळा आंघोळ केल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, लग्नाच्या काही आठवड्यांनंतर दोघांमध्ये स्वच्छतेवरून वाद सुरू झाला. त्यानंतर महिलेनं पतीचं घर सोडलं आणि आई-वडिलांसोबत राहू लागली. यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी छळाची तक्रार दाखल करून घटस्फोटाची मागणी केली. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांसोबत बातचीत केल्यानंतर पतीनं दररोज आंघोळ करण्यास सहमती दर्शविली, परंतु पत्नी सहमत नव्हती आणि त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला. आता पुढील सुनावणीसाठी या जोडप्याला २२ सप्टेंबर रोजी पुन्हा समुपदेशन केंद्राला भेट देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची सोशल मीडियावरही चर्चा आहे. सोशल मीडियावर घटस्फोट मागून महिलेनं योग्यच कृत्य केल्याचं नेटिझन्सचं म्हणणं आहे. एका युजरने कमेंट केली, अरे! किती घृणास्पद. तर दुसऱ्या युजर्सने टिप्पणी केली की, मला वाटतं की महिला पूर्णपणे योग्य आहे. 

टॅग्स :Divorceघटस्फोटJara hatkeजरा हटके