स्नान करताना पाहिल्याने तरुणीने घेतले जाळून

By Admin | Updated: July 23, 2016 05:36 IST2016-07-23T05:36:51+5:302016-07-23T05:36:51+5:30

स्नान करताना एका युवकाने पाहिल्यामुळे अपमानित झालेल्या तरुणीने (वय २०) जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना राजस्थानातील भिलवाडा जिल्ह्यात घडली

The woman took a bath and saw it while bathing | स्नान करताना पाहिल्याने तरुणीने घेतले जाळून

स्नान करताना पाहिल्याने तरुणीने घेतले जाळून


जयपूर : स्नान करताना एका युवकाने पाहिल्यामुळे अपमानित झालेल्या तरुणीने (वय २०) जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना राजस्थानातील भिलवाडा जिल्ह्यात घडली. देलाना गावची रहिवासी ही मुलगी ७० टक्के भाजली असून उदयपूर येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी मुलाचे वडील आणि एका नातेवाईकाला पोलीसांनी अटक केली आहे. या दोघांनी मुलीच्या घरी जाऊन भांडण केल्यानंतरच तिने स्वत:ला पेटवून घेतले होते.
बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. मुलगी घराजवळील न्हाणीघरात स्नान करीत होती. तेव्हा एक युवक (वय १८) आत डोकावून पाहत असल्याची बाब लक्षात येताच ती तरुणी किंचाळली. आवाज ऐकून तिचे मामा धावत आले आणि त्यांनी मुलाला पकडले, असे पोलीस अधक्षिक प्रदीप मोहन शर्मा यांनी सांगितले. मुलीच्या घरच्यांनी मुलाला सक्त ताकीद देऊन सोडून दिले.
मात्र, त्यानंतर मुलाचे वडील कृष्णलाल वैष्णव (४५) व नातेवाईक भगवान दास (३०) याच्यासह मुलीच्या घरी आले आणि त्यांनी मुलीच्या मामाशी भांडण सुरू केले. याला आपण कारणीभूत आहोत, असे वाटून मुलीने स्वत:ला पेटवून घेतले. या मुलीचा रुग्णालयात जबाब घेण्यात आला. (वृत्तसंस्था)

Web Title: The woman took a bath and saw it while bathing