मोरवाडीत महिलेवर तलवारीने वार
By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:31+5:302015-07-10T23:13:31+5:30
सिडको : वाहनाला कट मारण्याचा जाब विचारणार्या महिलेवर तलवारीने वार केल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास सिडकोतील पंडितनगरमध्ये घडली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

मोरवाडीत महिलेवर तलवारीने वार
स डको : वाहनाला कट मारण्याचा जाब विचारणार्या महिलेवर तलवारीने वार केल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास सिडकोतील पंडितनगरमध्ये घडली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़याबाबत अधिक माहिती अशी की, मंगला ज्ञानेश्वर सिरसाट(रा़काळेमामा चाळीसमोर, पंडितनगर, मोरवाडी, सिडको) या महिलेने संशयित विकास उजागरे, शंकर वंजारी, प्रशांत खरात, ऋषी धोंगडे, रंजाबाई कोल्हे व त्याचे तीन साथीदार यांना गाडीला कट का मारला याचा जाब विचारला़ याचा राग येऊन संशयितांनी मंगला सिरसाट यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच त्यातील एकाने तलवारीने वार केले़ यानंतर जखमी झालेल्या मंगलाबाईवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी आठ संशयितांना अटक केली आहे़ (वार्ताहर)