शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या महिलेला नवरा अन् मुलीकडून मारहाण; चाकूनं जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 13:36 IST

CoronaVirus News: पती, मुलीविरोधात महिलेकडून तक्रार दाखल; पोलिसांकडून तपास सुरू

छिंदवाडा: मध्य प्रदेशातील छिंदवाडात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कोरोनावर मात करून घरी परतलेल्या महिलेला तिच्या पती आणि मुलीनं मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोरोनाशी दोन हात करून १७ दिवसांनी घरी परतलेल्या महिलेचा पती आणि मुलीशी वाद झाला. प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचलं. ...तर कोरोना लस, अँटिबॉडीजचा उपयोग शून्य; महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटाछिंदवाडातील हॉटेल जे. पी. इनच्या मागील परिसरात राहणाऱ्या शोभना पटौरिया यांचा कोरोना अहवाल मे महिन्यात पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर गेल्या १७ दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनावर मात करुन त्या घरी परतल्या. यानंतर त्यांचा पती संजय पटौरिया आणि मुलगी वंशिका पटौरिया यांच्यासोबत उपचारांसाठी झालेल्या खर्चावरून वाद झाला.मे महिना ठरला धडकी भरवणारा! कोरोनाच्या आकडेवारीने नवा उच्चांक गाठला, रेकॉर्ड मोडलापती आणि मुलीनं आपल्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप शोभना यांनी केला. आपला जीव वाचवून शोभना तिथून पळून गेल्या. कोरोनातून नुकत्याच बऱ्या झालेल्या शोभना यांनी उपचार घेतले. त्यानंतर त्या ऑक्सिजन मास्क लावून पोलीस ठाण्यात पोहोचल्या. तिथे त्यांनी पती आणि मुलीविरोधात तक्रार दाखल केली.पती आणि मुलीनं चाकूनं जीवघेणा हल्ला केल्याचं शोभना यांनी पोलिसांना सांगितलं. 'मी कोरोनातून नुकतीच बरी झाले आहे. १६ ते १७ दिवसांनंतर मी घरी गेले होते. त्यावेळी पती आणि मुलीनं उपचारांवर झालेल्या खर्चावरून वाद घातला. पती आणि मुलीनं माझ्यावर चाकूनं हल्ला केला. मी तिथून कशीबशी निसटले,' असा जबाब शोभना यांनी नोंदवला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या