जादूटोणा केल्याच्या संशयातून महिलेची हत्या

By Admin | Updated: March 25, 2016 18:13 IST2016-03-25T18:13:35+5:302016-03-25T18:13:35+5:30

जादू टोणा करत असल्याच्या संशयावरुन कुटुंबातील सदस्यांनी एका महिलेला मेरपर्यंत बेदम मारहाण केली.

Woman murdered by suspected witchcraft | जादूटोणा केल्याच्या संशयातून महिलेची हत्या

जादूटोणा केल्याच्या संशयातून महिलेची हत्या

ऑनलाइन लोकमत 

रायपूर, दि. २५ - जादू टोणा करत असल्याच्या संशयावरुन कुटुंबातील सदस्यांनी एका महिलेला मेरपर्यंत बेदम मारहाण केली. छत्तीसगडच्या बलरामपूर जिल्ह्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी तुकान राम अगहारीया (४४) आणि त्याचा मुलगा राजेश (२४) या दोघांना अटक केली. 
बुधवारी रात्री दारुच्या नशेत तुकान आणि राजेशने कोनी बासी या महिलेला घराबाहेर खेचून काढले व तिला काठीने मरेपर्यंत बेदम मारहाण केली अशी माहिती बलरामपूर पोलिसांनी दिली. काही दिवसांपूर्वी राजेशच्या मुलाचा मृत्यू झाला.
कोनीने जादूटोणा केला म्हणून राजेशच्या मुलाचा मृत्यू झाला असे तुकानचे मत होते. त्यासाठी त्यांनी कोनीला जबर मारहणी केली त्यात तिचा मृत्यू झाला. कलम ३०२, ३२३ अंतर्गत आरोपींना अटक केली आहे. 
 

Web Title: Woman murdered by suspected witchcraft