शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

गुरुपर्वासाठी पाकिस्तानात गेलेल्या शीख महिलेने केला निकाह; निकाहनाम्यामुळे यंत्रणा हादरल्या, एकटीला परवानगी कशी मिळाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 15:31 IST

Sikh Woman Sarabjit Kaur: पाकिस्तानात गेलेल्या भारतीय शीख यात्रेकरुंमधील सरबजीत कौर ही महिला बेपत्ता झाल्याचे प्रकरण आता स्पष्ट झाले आहे.

Sarabjit Kaur: श्री गुरु नानक देवजी यांच्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने पाकिस्तानला गेलेल्या १९३२ भाविकांच्या जथ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कपूरथला जिल्ह्यातील अमानीपूर येथील ५२ वर्षीय सरबजीत कौर ही महिला जथ्यातून परतताना बेपत्ता झाली आहे. जत्था १० दिवसांनी भारतात परतल्यानंतर सरबजीत कौरचा शोध सुरू झाला असता या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

भारतीय तपास यंत्रणांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत, सरबजीत कौर केवळ बेपत्ता झाली नसून, तिने संपूर्ण योजना आखून पाकिस्तानात थांबण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा झाला आहे. तिने इस्लाम धर्म स्वीकारून आपले नाव 'नूर हुसैन' ठेवले असून, शेखुपुरा येथील नासिर हुसैन नावाच्या पाकिस्तानी तरुणाशी निकाह केला आहे. यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या हाती सरबजीत कौरचा निकाहनामा लागला आहे, ज्यामुळे ती याच उद्देशाने पाकिस्तानला गेली होती, हे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानी सोशल मीडियावर एक उर्दू निकाहनामा व्हायरल होत आहे, ज्यात हा निकाह शेखुपुरा येथील मशिदीत झाल्याचा दावा आहे.

पाकिस्तानमध्ये प्रवेश करताना इमिग्रेशन फॉर्ममध्ये सरबजीत कौरने राष्ट्रीयत्व आणि पासपोर्ट क्रमांक सारखे महत्त्वाचे रकाने जाणूनबुजून रिकामे सोडले होते. हा नियमभंग गंभीर मानला जात आहे. पासपोर्टवर तिचे मूळ निवासस्थान कपूरथला नसून, मुक्तसर जिल्ह्यातील मलौत येथील असल्याचे नमूद आहे. ती मागील अनेक वर्षांपासून पतीच्या घरी अमानीपूर येथे राहत असतानाही, पासपोर्टवर वडिलांचे नाव देण्यात आले होते.

गुन्हेगारी पार्श्वभूमी 

या प्रकरणाला आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे, ती म्हणजे सरबजीत कौरची गुन्हेगारी पार्श्वभूमी. कपूरथला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरबजीत कौरवर यापूर्वी  फसवणुकी संबंधित तीन गुन्हे दाखल होते, जे आता मिटवण्यात आले आहेत. तिच्या लवजोत सिंह आणि नवजोत सिंह या दोन मुलांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण १० गुन्हे दाखल आहेत आणि ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. सरबजीत कौरचे पती करनैल सिंह जवळपास ३० वर्षांपासून इंग्लंडमध्ये राहतात आणि तिचा त्यांच्यासोबत घटस्फोट झाला आहे. पाकिस्तानला जाण्यापूर्वी ती आपल्या पतीच्या अमानीपूर येथील घरी राहत होती.

एकटे जाण्याची परवानगी मिळाली कशी?

२०१८ मध्ये होशियारपूर येथील किरण बाला नावाच्या महिलेनेही जथ्यात जाऊन पाकिस्तानात धर्म बदलून निकाह केला होता. त्यानंतर, अशा विवादास्पद प्रकरणांना प्रतिबंध घालण्यासाठी एकाच कुटुंबातील सदस्याला सोबत घेऊन जाण्याची अट घालण्यात आली होती. असे असतानाही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि एकटी गेलेल्या सरबजीत कौरला पाकिस्तानमध्ये जाण्याची परवानगी मिळाली कशी, हा मोठा प्रश्न आहे. या जत्थ्यासाठी केंद्र सरकार तपासणी करून व्हिसा जारी करते. त्यामुळे नवी दिल्ली येथील पाकिस्तानी उच्चायुक्तालय आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या भूमिकेवरही आता संशय बळावला आहे.

दरम्यान, भारतीय तपास यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पाकिस्तानकडून अधिकृत माहिती मागितली आहे. सरबजीत कौरने खरंच धर्म परिवर्तन केले आहे की, हे प्रकरण एखाद्या मोठ्या नेटवर्कचा भाग आहे, याचा कसून तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sikh Woman Converts, Marries in Pakistan; Security Agencies Investigate

Web Summary : A Sikh woman, Sarabjit Kaur, converted to Islam and married a Pakistani man after traveling to Pakistan for Guru Purnima. Investigations are underway to determine how she was allowed to travel alone despite a criminal background and existing restrictions. Concerns rise over potential security implications and the role of involved authorities.
टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान