शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

व्हीलचेअर नसल्यामुळे महिलेला करावे लागले 'दिव्य'; नवऱ्याला पाठीवरून आणले सरकारी कार्यालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 13:36 IST

एका अपघातात महिलेच्या पतीचा पाय तुटला होता.

मथुरा: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दराऱ्यामुळे सरकारी कारभाराची पद्धत सुधारल्याचे दावा भाजपाचे अनेक नेते आणि समर्थक करतात. मात्र, असल्या इशाऱ्यांना सरकारी बाबू फारशी भीक घालत नसल्याची अनेक उदाहरणे सर्रास पाहायला मिळतात. उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे पुन्हा एकदा सरकारी कारभारातील असंवेदनशीलपणा समोर आला. एरवी खुद्द पंतप्रधान मोदींकडून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक सरकारी कामे घरबसल्या करता येणे शक्य असल्याचा दावा केला जातो. मात्र, ज्या सरकारी कामांसाठी असल्या तंत्रज्ञानाची खरी निकड असते तिथे सरकारी घोडे कशी पेंड खाते, याचा प्रत्यय या घटनेमुळे आला. मथुरेतील एका दिव्यांग व्यक्तीच्या पत्नीला यामुळे मोठे दिव्य पार पाडावे लागले. या महिलेचा पती शारीरिकदृष्ट्या अधू असल्यामुळे त्याला दिव्यांग प्रमाणपत्र हवे होते. मात्र, हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्याला सरकारी कार्यालयात हजर राहावे लागणार होते. परंतु, हालाखीच्या परिस्थितीमुळे या व्यक्तीकडे बाहेर वावरण्यासाठी लागणारी व्हीलचेअर किंवा अन्य कोणतेही साधन नव्हते.  एका अपघातात महिलेच्या पतीचा पाय तुटला होता. तीन वर्षांपूर्वी हा अपघात झाला होता, तेव्हापासून ही महिला दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सीएमओ कार्यालयात फे-या मारत होती. मात्र, अनेक विनवण्या करूनही तिच्या नवऱ्याला दिव्यांग प्रमाणपत्र दिले जात नव्हते. मात्र, या खंबीर महिलेने हार मानली नाही. तिने मंगळवारी आपल्या दिव्यांग पतीला पाठीवर उचलून मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले. याठिकाणी सगळे सोपस्कार पार पाडल्यानंतर बुधवारी तिच्या पतीला दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले.  आपल्या पतीच्या हक्कासाठी खंबीरपणा दाखवणाऱ्या या महिलेचे कौतुक होत आहे. परंतु, दुसरीकडे या घटनेमुळे सरकारच्या या कार्यपद्धतीवर अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशGovernmentसरकार