महिलेने सासरच्या सहा जणांना जिवंत जाळले
By Admin | Updated: May 21, 2015 08:33 IST2015-05-20T16:56:45+5:302015-05-21T08:33:17+5:30
वैवाहिक जीवनातील वादातून पांडेश्वरी या महिलेने आपल्या सासरच्या मंडळींना जीवंत जाळले.

महिलेने सासरच्या सहा जणांना जिवंत जाळले
>मदुराई, दि. २० - वैवाहिक जीवनातील वादातून पांडेश्वरी या महिलेने आपल्या सासरच्या मंडळींना जीवंत जाळले.
कन्नन व पांडेश्वीर यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. आपसातील मतभेदांमुळे हे दांपत्य एक वर्ष वेगळे राहत होते. गावकऱ्यांच्या समजवण्यावरून कन्नन आपल्या मुळगावी चेन्नईहून परत येऊन आपल्या कुटुंबियांसोबत राहत होता. काही दिवसांपूर्वीच आपल्या कुटुंबियांसोबत राहायला आलेल्या कन्ननच्या घरी पांडेश्वरी आली व तीने त्यांच्या घराचे दार बाहेरून बंद करत त्यावर रॉकेल ओतून पेटवून दिले. या घटनेमध्ये कन्नन ची आई वेळी (६५), त्याची बहिण पच्चीयामल (५०) व सुगंधी (३५) व तीची दोन मुले संगीत(१२) व संगीता (१७) हे आगीत होरपळून जागीच गतप्राण झाले. तर, सुगंधीचाच तेरा वर्षाचा मुलगा विनीत याला शेजाऱ्यांनी उपचाराकरता सरकारी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारा दरम्यान मृ्त्यू झाल्याचे येथील पोलीस निरीक्षक मनोहरन यांनी सांगितले. या घटनेनंतर पांडेश्वरी सौदापेट्टी पोलिसांना शरण गेली.