‘प.बंगालला होईल तेवढी मदत करू’

By Admin | Updated: March 9, 2015 23:33 IST2015-03-09T23:33:08+5:302015-03-09T23:33:08+5:30

पश्चिम बंगालच्या विकासासाठी केंद्राकडून मदतीचा हात आखडता घेतला जाणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री

'Woe to Bengal as much as possible' | ‘प.बंगालला होईल तेवढी मदत करू’

‘प.बंगालला होईल तेवढी मदत करू’

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या विकासासाठी केंद्राकडून मदतीचा हात आखडता घेतला जाणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिले. सोमवारी बॅनर्र्जींनी मोदी यांची भेट घेतली, त्यावेळी पंतप्रधानांनी हे आश्वासन दिले; परंतु राज्याचे कर्ज माफ करण्याच्या आवाहनावर कोणताही शब्द दिला नाही.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर बॅनर्जी यांनी त्यांची प्रथमच भेट घेतली. ममता बॅनर्जी यांनी नंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितले की, ‘आमच्या राज्याने आर्थिक शिस्त पाळल्याबद्दल मोदी यांनी कौतुक केले. तुम्हाला मदत करण्याचाही आम्ही प्रयत्न करू परंतु देशदेखील आर्थिक आघाडीवर अनेक अडचणींना तोंड देत आहे, असे मोदी यांनी सांगितल्याचे त्या म्हणाल्या.
पश्चिम बंगालला कशा प्रकारे मदत करता येईल हे आम्ही बघू, असे पंतप्रधान म्हणाल्याचेही त्या म्हणाल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: 'Woe to Bengal as much as possible'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.