फत्तेपूर खून खटल्यात साक्ष
By Admin | Updated: March 11, 2016 00:27 IST2016-03-11T00:27:46+5:302016-03-11T00:27:46+5:30
जळगाव : फत्तेपूर येथील छायाबाई रामलाल गनबास या महिलेच्या खून प्रकरणात गुरुवारी न्या.लव्हेकर यांच्या न्यायालयात फिर्यादी तथा मयत महिलेचा पती रामलाल सोनु गनबास व घटनास्थळावरील पंच मक्सु गफुर तडवी यांची साक्ष नोंदविण्यात आली. १० डिसेंबर २०१४ रोजी छायाबाई घरात स्वयंपाक करत असताना निजाम चिंधू तडवी याने घरातून ओढून मारहाण केली होती. पोटात चाकू खुपसल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता.मुलगा रोहीत याने ही घटना पाहिली आहे. तो देखील गुरुवारी न्यायालयात आला होता. २८ मार्च रोजी त्याची साक्ष नोंदविली जाणार आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी काम पाहिले.

फत्तेपूर खून खटल्यात साक्ष
ज गाव : फत्तेपूर येथील छायाबाई रामलाल गनबास या महिलेच्या खून प्रकरणात गुरुवारी न्या.लव्हेकर यांच्या न्यायालयात फिर्यादी तथा मयत महिलेचा पती रामलाल सोनु गनबास व घटनास्थळावरील पंच मक्सु गफुर तडवी यांची साक्ष नोंदविण्यात आली. १० डिसेंबर २०१४ रोजी छायाबाई घरात स्वयंपाक करत असताना निजाम चिंधू तडवी याने घरातून ओढून मारहाण केली होती. पोटात चाकू खुपसल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता.मुलगा रोहीत याने ही घटना पाहिली आहे. तो देखील गुरुवारी न्यायालयात आला होता. २८ मार्च रोजी त्याची साक्ष नोंदविली जाणार आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी काम पाहिले.