साक्षीदारांनी सलमानला ओळखले

By Admin | Updated: June 24, 2014 09:09 IST2014-06-24T00:25:54+5:302014-06-24T09:09:45+5:30

चौघांना चिरडणारा अभिनेता सलमान खान या घटनेआधी व नंतर नेमका कोठे होता याची माहिती देणा:या दोन साक्षीदारांची साक्ष सोमवारी सत्र न्यायालयात नोंदवली़

The witnesses recognized Salman | साक्षीदारांनी सलमानला ओळखले

साक्षीदारांनी सलमानला ओळखले

>मुंबई :  बारा वर्षापूर्वी वांद्रे येथे भरधाव गाडी चालवून चौघांना चिरडणारा अभिनेता सलमान खान या घटनेआधी व नंतर नेमका कोठे होता याची माहिती देणा:या दोन साक्षीदारांची साक्ष सोमवारी सत्र न्यायालयात नोंदवली़ या दोघांनी सलमानला न्यायालयात ओळखल़े
यातील एका साक्षीदाराचे नाव रिझवान खान आह़े रिझवान हे रेन बारमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात़ सत्र न्यायाधीश डी़डब्ल्यू़ देशपांडे यांच्यासमोर रिझवान यांची साक्ष नोंदवली़  ते म्हणाले, वरील घटना घडण्याआधी सलमान व त्याचा भाऊ सोहेल खान मित्रंसोबत या बारमध्ये आला होता़ सलमान आला तेव्हा बारमध्ये खूप गर्दी होती़ त्यामुळे तो सोहेलसोबत काउंटरलाच उभा होता़ नंतर त्यांना बसायला जागा मिळाली़ त्यांनी दारू व स्नॅक्सची ऑर्डर दिली़ ही ऑर्डर वेटरने घेतली होती़ तसेच सलमानने तेव्हा मद्यपान केले की नाही हे माहिती नाही़ पण बारमधून जाताना सलमान माङया बाजूनेच गेला़ तेव्हा त्याने मद्यपान केल्याचे जाणवले नाही तो सरळ चालत गेला़
त्यानंतर रामश्री पांडे यांची साक्ष नोंदवली़ पांडे यांची ही घटना घडली त्या अमेरिकन बेकरीशेजारी दुधाची डेअरी आह़े ते म्हणाले, ही घटना घडली तेव्हा जोराने आवाज झाला़  त्या वेळी मी गाडीपासून 15 फुटांवर उभा होतो़ तेव्हा सलमान चालकाच्या सीटच्या दरवाजातून बाहेर पडला; तर त्याचा सुरक्षारक्षक रवींद्र पाटील गाडीबाहेर होता. जमाव संतप्त झाला होता व सलमानच्या गाडीवर दगडफेक करत होता़ (प्रतिनिधी)

Web Title: The witnesses recognized Salman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.