मुंबई हल्ल्यातील साक्षीदार उलटला
By Admin | Updated: December 10, 2015 23:13 IST2015-12-10T23:13:23+5:302015-12-10T23:13:23+5:30
पाकिस्तानात सुनावणी सुरू असलेल्या मुंबई हल्ला प्रकरणातील एक प्रमुख साक्षीदार आज उलटला. फरिदकोटच्या प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मुदस्सीर लखवी

मुंबई हल्ल्यातील साक्षीदार उलटला
लाहोर : पाकिस्तानात सुनावणी सुरू असलेल्या मुंबई हल्ला प्रकरणातील एक प्रमुख साक्षीदार आज उलटला. फरिदकोटच्या प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मुदस्सीर लखवी, असे या साक्षीदाराचे नाव आहे. अजमल कसाब जिवंत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
न्यायालयातील एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. या शिक्षकाने सांगितले की, कसाबला मी शिकविले आहे. याच शाळेत कसाब तीन वर्षे शिकला. रावळपिंडीतील अडियाला तुरुंगात दहशतवादविरोधी न्यायालयात ही सुनावणी झाली. या अधिकाऱ्याने सांगितले की, सदर शिक्षकाने कसाब जिवंत असल्याचे सांगून याचिकाकर्त्यांची मोठी अडचण केली