काम न करता हे जोडपे कमावते लाखो रुपये

By Admin | Updated: April 8, 2017 00:35 IST2017-04-08T00:35:54+5:302017-04-08T00:35:54+5:30

तुम्ही काहीही काम-धाम करणार नाही परंतु तुमची कमाई लाखो रुपयांत असेल, असे कधी होईल का? सगळ््यांनाच आपल्याबाबतीत असे व्हावे, असे वाटते

Without the work, these couples earn millions of rupees | काम न करता हे जोडपे कमावते लाखो रुपये

काम न करता हे जोडपे कमावते लाखो रुपये

तुम्ही काहीही काम-धाम करणार नाही परंतु तुमची कमाई लाखो रुपयांत असेल, असे कधी होईल का? सगळ््यांनाच आपल्याबाबतीत असे व्हावे, असे वाटते, पण एक जोडपे याबाबतीत नशीबवान ठरले. या जोडप्याची कमाई लाखो रुपये आहे. त्यांचे काम माहिती करून घेऊन तुम्ही थक्क व्हाल. हे जोडपे आपल्या छायाचित्रांच्या जोरावर एवढी कमाई करीत आहे. कित्येक वेळा त्यांची कमाई ही पाच लाख रुपयेही होते. जॅक मोरिस आणि त्याची मैत्रीण लॉरने बुलेन इन्स्टाग्रामवर आपल्या छायाचित्रांच्या माध्यमातून पैसे कमावतात. हे दोघे जगभर फिरतात व ठिकाण आणि ब्रँडला प्रमोट करून लाखो रुपये कमावतात. हे दोघे ज्या ठिकाणी फिरतात तेथील छायाचित्रे आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करतात. त्याबदल्यात त्यांना ब्रँड किंवा ठिकाणाच्या मालकाकडून मोठी रक्कम मिळते. मोरिसने सांगितले की त्याला एकदा फोन कंपनीकडून तीन ते पाच फोटो अपलोड करण्यासाठी २२ लाख रुपये मिळाले होते.

Web Title: Without the work, these couples earn millions of rupees