शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

खेदजनक; गावात रस्ताच नसल्यानं गर्भवतीला 12 किलोमीटरपर्यंत साडीत गुंडाळून नेलं !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 18:34 IST

अशाच एका गावात रस्ता नसल्यानं एका गर्भवती महिलेला विजयनगरम या जिल्ह्याच्या ठिकाणी आणण्यासाठी चक्क साडीत गुंडाळून 12 किलोमीटरपर्यंत गावक-यांना पायपीट करावी लागली आहे.

हैदराबाद- भारतातल्या अनेक खेड्यांत आज ब-यापैकी सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. रस्ता, वीज खेडोपाड्यात घरोघरी पोहोचल्याचं सरकार वारंवार सांगत असतं. परंतु देशातील काही राज्यांत अशीही काही गावं आहेत, तिकडे अद्यापही रस्ताच नाही. आंध्र प्रदेश विजयनगरम जिल्ह्यातील एका गावातही एवढी वर्षं स्वातंत्र्य मिळून रस्ता झालेला नाही. त्यामुळे गावक-यांना जिल्ह्यापर्यंत येण्यासाठी मोठं अंतर पार करावं लागतं.अशाच एका गावात रस्ता नसल्यानं एका गर्भवती महिलेला विजयनगरम या जिल्ह्याच्या ठिकाणी आणण्यासाठी चक्क साडीत गुंडाळून 12 किलोमीटरपर्यंत गावक-यांना पायपीट करावी लागली आहे. विशेष म्हणजे महिलेनं रस्त्यामध्येच मुलाला जन्म दिला. परंतु अँब्युलन्स पोहोचण्याच्या आधीच बाळाचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेश विजयनगरम जिल्ह्यात 22 वर्षीय जिंदम्माला प्रसव कळा सुरू झाल्या. जिंदम्माची परिस्थिती पाहता तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. जिंदम्माचं घर घनदाट जंगलात आहे. त्यामुळे तिथे अँब्युलन्स पोहोचू शकली नाही. त्यानंतर जिंदम्मा हिला गावक-यांनी साडीत गुंडाळून 12 किलोमीटर दूर असलेल्या रुग्णालयात नेण्याचं ठरवलं. परंतु जिंदम्मा हिला वाटेतच जोरजोरात प्रसव कळा होऊ लागल्या. प्रसव कळा सहन न झाल्यानं जिंदम्मा हिने रस्त्यातच बाळाला जन्म दिला.परंतु अँब्युलन्स येण्याआधीच बाळाचा मृत्यू झाला. खरं तर स्वातंत्र्याला एवढी वर्षं होऊनही कोंडथमारा गावातून डुग्‍गेरुदरम्यान अद्यापही रस्ता नाही. जिंदम्‍मा यांना पार्वतीपूरम आईटीडीए रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.सध्या त्या गर्भवती महिलेला प्लेसेंटोवर ठेवण्यात आलं आहे. तिची प्रकृती स्थिर असून, तब्येतीत सुधारणा होत असल्याचं डॉक्टर एस. एन. ज्योती यांनी सांगितलं आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश