शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

'लॉकडाऊन केले नसते, तर 15 एप्रिलपर्यंत देशात 8 लाखहून अधिक कोरोना रुग्ण झाले असते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 22:11 IST

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारने फार चांगली पावले उचलली आहेत. 2 राज्यांत आणि केंद्र स्तरावर देशात केवळ कोरोनाशी संबंधित उपचारासाठी एकूण 587 रुग्णालये आहेत.

ठळक मुद्देदेशात केवळ कोरोनाशी संबंधित उपचारासाठी एकूण 587 रुग्णालयेकोरोनाग्रस्तांसाठी देशभरात 1 लाख आयसोलेशन बेडआतापर्यंत देशातील मृतांचा आकडा 239वर

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता 7,447 वर पोहोचली आहे. जर वेळीच लॉकडाऊनचा निर्णय घेतला नसता, तर आज देशाचे चीत्र फार वेगळे राहिले असते. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी वेळीच लॉकडाऊनचा निर्णय घेतला नसता, तर कोरोना बाधितांचा आकडा 41 टक्क्यांनी वाढला असता आणि 15 अप्रिलपर्यंत हा आकडा तब्बल 8.2 लाखांवर पोहोचला असता, असे केंद्रिय आरोग्य मंत्रालयाचे जॉइंट सेक्रटरी लव अग्रवाल यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

'भारताने फार पूर्वीच महत्वपूर्ण निर्णय घेतले''कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारने फार चांगली पावले उचलली आहेत. दोन राज्यांत आणि केंद्र स्तरावर, देशात केवळ कोरोनाशी संबंधित उपचारासाठी एकूण 587 रुग्णालये आहेत. याशिवाय देशभरात 1 लाख आयसोलेशन बेड आणि 11,500 आयसीयूदेखील तयार आहेत, असे अग्रवाल म्हणाले.

24 तासांत 1,035 नवे रुग्ण आढळले -अग्रवाल म्हणाले, देशात आतापर्यंत एकूण 7,447 जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. यापैकी 643 जण बरे होऊन घरीही गेले आहेत. गेल्या 24 तासांत 1035 नवे कोरोनाबाधीत आढळून आले असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे.  देशात आतापर्यंत मृतांचा आकडा 239वर जाऊन पोहोचला आहे.

कोरोना टेस्टचा वेग वाढला -आता देशात कोरोना टेस्टचा वेग वाढला आहे. गुरुवारी 16,002 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या होत्या. तर शुक्रवारी 16,764 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकलच्या अभ्यासानुसार, देशात आतापर्यंत 1,71,718 सॅम्पलची तपासणी झाली आहे. हे काम 146 सरकारी तसेच 67 प्रायव्हेट लॅबमध्ये केले जात आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतState Governmentराज्य सरकारGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान