भाडेवाढ न करता सुरेश 'प्रभूं'ची प्रवाशांवर कृपा

By Admin | Updated: February 26, 2015 14:19 IST2015-02-26T12:17:59+5:302015-02-26T14:19:11+5:30

यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी कोणतीही भाडेवाढ न करता रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा आहे.

Without the hike, Suresh Prabhu has got blessings on the passengers | भाडेवाढ न करता सुरेश 'प्रभूं'ची प्रवाशांवर कृपा

भाडेवाढ न करता सुरेश 'प्रभूं'ची प्रवाशांवर कृपा

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २५ - देशभराचे लक्ष लागलेले रेल्वे अर्थसंकल्प रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत सादर केले. सुरेश प्रभूंच्या भाषणाला सुरुवात झाली असून सुरेश प्रभू महाराष्ट्रावर काय कृपादृष्टी दाखवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

रेल्वेची आर्थिक स्थिती बिकट असल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केले. सध्या प्रभू यांचे बजेट वाचन सुरु असून यंदा प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ होणार नाही अशी महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली.   कोणत्याही नवीन गाड्यांची घोषणा नाही, सर्वेक्षण करुनच नवीन गाड्यांची घोषणा करणार असे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले.

रेल्वे अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्दे 

- स्वयंरोजगार आणि मनुष्यबळ विकासावर भर देणार, कोकण रेल्वेवर गेल्या तीन महिन्यांपासून प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवला जात आहे 

- रेल्वे गाड्यांना व स्टेशनला कंपन्यांची नावे देऊन पैसे कमवणार

- यावर्षाअखेरपर्यंत देशाच्या किनारपट्टीवरील भागांना रेल्वेशी जोडण्यासाठी कोस्टल कनेक्टिव्हीटी प्रॉग्रेम सुरु करणार
- कामगिरीवर आधारित बोनस देण्याची पद्धत देणार, आरपीएफसाठी विद्यापीठ स्थापन करणार
- रेल्वेत सौर उर्जेचा वापर करणार
- रेल्वेच्या विकासासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप राबवणार
- सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसोबत नवीन रेल्वे मार्ग बांधण्यासाठी संयुक्त योजना राबवणार 
- कायाकल्प योजनेद्वारे भारतीय रेल्वेतील तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण करणार
- देशातल्या ४ विद्यापीठांमध्ये रेल्वेचे संशोधन केंद्र
- ट्रेनची टक्कर टाळण्यासाठीही अलार्म सिस्टम
- वाराणसीमध्ये मदन मोहन मालवीय यांच्या नावाने रेल्वेचे संशोधन केंद्र स्थापन करणार
- रेल्वेचे अपघात टाळण्यासाठी जूनपर्यंत अॅक्शन प्लॅन मांडणार, मानव विरहित फाटकांवर अलार्म बसवणार
- १०८ गाड्यांमध्ये ई कॅटरिंगची सुविधा देणार 
- मुंबई - दिल्लीसोबतच अन्य नऊ मार्गांवर हायस्पीड ट्रेन धावणार
- प्रवाशांच्या सुरक्षा विषयक तक्रारींसाठी १८२ ही टॉल फ्री हेल्पलाईन सुरु करणार 
- लिफ्ट आणि स्वयंचलित जिन्यांसाठी १२० कोटी रुपयांचा निधी देणार
- ४०० रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा देणार
- पूर्वोत्तर आणि जम्मू काश्मीरमध्ये रेल्वेचे जाळे तयार करण्यास प्राधान्य  
- रेल्वे आणि स्टेशनवरील स्वच्छतेसाठी नवीन स्वच्छता विभाग
- मोठ्या शहरांमधील १० रेल्वे स्थानकांवर सॅटेलाईट रेल्वे टर्मिनल करणार
- प्रवाशांना दोन महिन्यांऐवजी ४ महिन्यांअगोदरच आरक्षण करता येणार
- यावर्षी १७ हजार स्वच्छता गृहांचे बायो टॉयलेटमध्ये पुनर्विकास करणार
- ऑपरेशन ५ मिनीट राबवणार, यामुळे अनारक्षित तिकीटावर प्रवास करणा-या प्रवाशांना पाच मिनीटांत तिकीट देण्याचे लक्ष्य
- खासदारांनी त्यांच्या निधीचा जास्तीत जास्त वापर रेल्वे स्टेशनवरील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी करावे
- सर्वसामान्यांसाठी ठराविक गाड्यांमधील जनरल डब्यांची संख्या वाढवणार
- रेल्वेतून प्रवास करणा-या ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाइन व्हिलचेअर बुक करण्याची सुविधा देणार
- प्रवाशांना गाड्यांचे आगमन व डिपार्चरच्या वेळेसंबंधीची एसएमसद्वारे देणार
- महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काही लांब पल्ल्यांच्या गाड्या व उपनगरीय गाड्यांच्या महिल्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणार
- विमानाप्रमाणेच रेल्वेतही व्हॅक्यूम टॉयलेट तयार करणार
- निर्भया फंडमधील निधीचा वापर रेल्वेतून प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षेसाठी करणार
- लिफ्ट आणि स्वयंचलित जिन्यांसाठी १२० कोटी रुपयांचा निधी देणार 
- प्रवाशांना गाड्यांचे आगमन व डिपार्चरच्या वेळेसंबंधीची एसएमसद्वारे देणार
- रेल्वेत पार्टनरशिपची गरज, राज्य सरकारांसमवेत मिळून काम करण्याची गरज
- सुरक्षित आणि पायाभूत सुविधा पुरवणे हेच आमचे लक्ष्य
- २० हजार सूचनांचा अर्थसंकल्पात समावेश केला गेला आहे
- काही तरी नवीन जोडावे लागेल, जुने तोडावे लागेल, सामर्थ्य दाखवावे लागेल
- आगामी पाच वर्षांत रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करणार, यामध्ये कमी खर्च, यामध्ये भूसंपादनाची समस्या नाही, वेग वाढवल्यास वेळेतही बचत
- रेल्वे मंत्रालयावर जनतेच्या अपेक्षांचे ओझे आहे, त्यांना चांगल्या सेवेची अपेक्षा
- गेल्या काही वर्षांत रेल्वेकडे दुर्लक्ष झाले

 

 

Web Title: Without the hike, Suresh Prabhu has got blessings on the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.