शंभर दिवसांतच मोदीलाट ओसरली
By Admin | Updated: September 17, 2014 18:42 IST2014-09-17T03:22:54+5:302014-09-17T18:42:33+5:30
नऊ राज्यांमधील विधानसभेच्या 33 आणि लोकसभेच्या 3 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला निम्म्यापेक्षा अधिक जागांवर धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आह़े

शंभर दिवसांतच मोदीलाट ओसरली
पोटनिवडणुकीत भाजपाची निराशा : निम्म्यापेक्षा अधिक जागांवर पराभव; उत्तर प्रदेश, राजस्थानात पीछेहाट, काँग्रेसमध्ये उत्साह
नवी दिल्ली : नऊ राज्यांमधील विधानसभेच्या 33 आणि लोकसभेच्या 3 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला निम्म्यापेक्षा अधिक जागांवर धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आह़े उत्तर प्रदेश आणि राजस्थानात भाजपाचा आलेख उतरला असून, मोदींच्या गुजरातेतही भाजपाची पीछेहाट झाली आह़े विशेष म्हणजे काँग्रेसने गुजरातेतील 3 विधानसभा जागा भाजपाकडून खेचून आणल्या आहेत़ भाजपाची आणि पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता घटल्याचे चित्र आणि केंद्रातील सत्ता मिळाल्यापासून 1क्क् दिवसांतच मोदी लाट ओसरल्याचे वास्तव अधोरेखित झाल्याने काँग्रेस गोटात उत्साहाला उधाण आले आहे.
लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 33 जागांसाठी 13 सप्टेंबरला पोटनिवडणूक झाली होती़ यापैकी 9 राज्यांतील मतमोजणी आज मंगळवारी पार पडली़छत्तीसगडमधील एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी 2क् सप्टेंबरला होणार आह़े
पश्चिम बंगालमध्ये 1 जागा जिंकून भाजपाने खाते उघडल़े तथापि लोकसभा निवडणुकीत ज्या राज्यांनी भाजपाला व मोदींना भरभरून मते दिली, त्याच राज्यांतील पोटनिवडणुकीचे निकाल भाजपासाठी निराशाजनक ठरले आहेत़ याउलट दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत ज्या राज्यांत खातेही उघडले नव्हते त्या राज्यांतील पोटनिवडणुकीत काँग्रेसने भरीव कामगिरी केली आह़े भाजपाशासित गुजरातेत काँग्रेसने 3 जागा खेचून आणल्या असून, राजस्थानात 4पैकी 3 जागा पदरात पाडून घेत भाजपाला जोरदार धक्का दिला आह़े पुढील महिन्यात महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुका बघता, हा निकाल काँग्रेसच्या आशा पल्लवित करणारा आह़े
लोकसभेत स्थिती जैसे थे
लोकसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत स्थिती जैसे थे राहिली़ भाजपा, सपा आणि तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस)ने अनुक्रमे वडोदरा (गुजरात), मैनपुरी (उत्तर प्रदेश) आणि मेडक (तेलंगण)ची जागा जिंकली़ गुजरात, उत्तर प्रदेश आणि तेलंगणमध्ये अनुक्रमे भाजपा, सपा आणि टीआरएसची सत्ता आह़े या ठिकाणी या पक्षांनी आपल्या लोकसभा जागा कायम ठेवल्या़
यूपीत लोकप्रियता घटली
उत्तर प्रदेशात 11 विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीचे निकाल बघता, भाजपाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे दिसले. समाजवादी पक्षाने 11पैकी 8 जागांवर कब्जा केला. 3 जागी भाजपा विजयी झाली आह़े या पोटनिवडणुकीत बसपाने आपले उमेदवार उतरविले नव्हत़े काँग्रेस व सपाने सर्व 11 जागा लढल्या होत्या़ भाजपाने 1क् जागा लढत 1 जागा आपल्या मित्र पक्ष ‘अपना दल’साठी सोडली होती़
गुजरातेत काँग्रेसला यश
आसाम : आसामातील तीन विधानसभा जागांपैकी एक जागा सत्ताधारी काँग्रेसने जिंकली असून अन्य दोन जागांपैकी विरोधी पक्ष भाजपा आणि ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने प्रत्येकी एक जागा खिशात टाकली आह़े
गुजरात : मोदींच्या गुजरातेत नऊपैकी सहा जागा भाजपाने जिंकल्या आहेत़ तीन जागा भाजपाकडून खेचून आणत काँग्रेसने सर्वाचेच लक्ष वेधून घेतले आह़े
विधानसभा
पक्षविजयबदल
भाजपा+13 -13
सपा8+7
काँग्रेस7+5
इतर4+1
राजस्थानात यशानंतर सचिन पायलट यांच्यासह काँग्रेसने कार्यकत्यांनी
जल्लोष केला.
वसुंधरा राजेंना जोर का धक्का
राजस्थानातन
चार विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपा प्रणीत वसुंधरा राजे सरकारला ‘जोर का’ धक्का दिला. 3 जागा जिंकल्या आहेत़ भाजपाच्या वाटय़ाला केवळ 1 जागा आली आह़े़