वेतनाच्या फायली प्रलंबित ठेवून कॅफो औरंगाबादला रवाना
By Admin | Updated: November 7, 2015 22:29 IST2015-11-07T22:29:00+5:302015-11-07T22:29:00+5:30
जळगाव- जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. आता दिवाळी उसनवारीने साजरी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. यात शनिवारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू सोळुंके यांच्याकडे विविध विभागांमधील कर्मचार्यांच्या वेतनासंबंधीच्या फायली सहीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. परंतु सोळुंके हे जिल्हा परिषदेत आपल्या दालनात आलेच नाही. त्यांनी आपल्या शासकीय निवासस्थानावरून कारभार चालविला. त्यांनी बांधकाम व इतर कामांसंबंधीच्या बिलांवर सा केल्या. परंतु वेतनासंबंधी आलेल्या निम्मे फायली प्रलंबित ठेवून सोळुंके हे आपल्या मूळ गावी औरंगाबादला सायंकाळी निघून गेले. यामुळे आता जि.प.च्या कर्मचार्यांना वेतन मिळण्याची अपेक्षा धूसर झाली आहे.

वेतनाच्या फायली प्रलंबित ठेवून कॅफो औरंगाबादला रवाना
ज गाव- जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. आता दिवाळी उसनवारीने साजरी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. यात शनिवारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू सोळुंके यांच्याकडे विविध विभागांमधील कर्मचार्यांच्या वेतनासंबंधीच्या फायली सहीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. परंतु सोळुंके हे जिल्हा परिषदेत आपल्या दालनात आलेच नाही. त्यांनी आपल्या शासकीय निवासस्थानावरून कारभार चालविला. त्यांनी बांधकाम व इतर कामांसंबंधीच्या बिलांवर सा केल्या. परंतु वेतनासंबंधी आलेल्या निम्मे फायली प्रलंबित ठेवून सोळुंके हे आपल्या मूळ गावी औरंगाबादला सायंकाळी निघून गेले. यामुळे आता जि.प.च्या कर्मचार्यांना वेतन मिळण्याची अपेक्षा धूसर झाली आहे. निदर्शने करणारसोळुंके यांनी ठरविले असते तर ते सर्व विभागांच्या वेतनासंबंधीच्या फायलींवर निर्णय घेऊ शकले असते, परंतु त्यांनी तसे केले नाही. यामुळे आता जि.प.च्या विविध कर्मचारी संघटना येत्या १० रोजी सकाळीच सोळुंके यांच्याविरोधात निदर्शने करणार आहेत, अशी माहिती मिळाली. यासंदर्भात सोळुंंके यांच्याशी संपर्क साधला, पण तो होऊ शकला नाही.