जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यातून पदाधिकार्‍यांचा भ्रमनिराश नियमांच्या काटेकोर पालनाने घोडेबाजाराला लगाम

By Admin | Updated: May 21, 2014 00:00 IST2014-05-20T23:32:07+5:302014-05-21T00:00:23+5:30

अकोला : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये पदाधिकार्‍यांकडून होणार्‍या घोडेबाजाराला यावर्षी लगाम लागला. शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया रद्द होणे आणि बदली करताना अधिकार्‍यांनी नियमावर बोट ठेवल्याने पदाधिकार्‍यांचा पुरता भ्रमनिराश झाला.

Withholding the rules of excise rules of office bearers in exchange for Zilla Parishad employees | जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यातून पदाधिकार्‍यांचा भ्रमनिराश नियमांच्या काटेकोर पालनाने घोडेबाजाराला लगाम

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यातून पदाधिकार्‍यांचा भ्रमनिराश नियमांच्या काटेकोर पालनाने घोडेबाजाराला लगाम

अकोला : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये पदाधिकार्‍यांकडून होणार्‍या घोडेबाजाराला यावर्षी लगाम लागला. शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया रद्द होणे आणि बदली करताना अधिकार्‍यांनी नियमावर बोट ठेवल्याने पदाधिकार्‍यांचा पुरता भ्रमनिराश झाला.
जिल्हा परिषदेतील वर्ग क आणि ड संवर्गातील कर्मचार्‍यांच्या बदल्या १९ आणि २0 मे असे दोन दिवस करण्यात आल्या. यात विविध विभागांचा समावेश होता. पहिल्या दिवशी कर्मचार्‍यांची संख्या कमी असलेल्या विभागातील कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया आटोपली. मंगळवारी आरोग्य, पंचायत आणि सामान्य प्रशासन या तीन प्रमुख विभागातील ९४ कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय आणि विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या. यात बहुतांश बदल्या या विनंतीवरून असल्याने जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांनी त्यात हात धुऊन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकार्‍यांनी नियमांवर बोट ठेवत कोणत्याही पदाधिकार्‍याला बदली प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे सर्वच पदाधिकार्‍यांचा भ्रमनिराश झाला. सर्वात मोठा घोडेबाजार शिक्षकांच्या बदल्यांमधून होतो. मात्र, समायोजनापूर्वी शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविता येत नसल्याने ती रद्द करण्यात आली. त्यामुळे येथेही पदाधिकार्‍यांच्या पदरी निराशाच आली. 


** ९४ कर्मचार्‍यांच्या बदल्या
जिल्हा परिषदेतील आरोग्य, पंचायत आणि सामान्य प्रशासन विभागातील ९४ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. पंचायत विभागांतर्गत विस्तार अधिकार्‍यांच्या २, ग्रामविकास अधिकार्‍यांच्या २ आणि ग्रामसेवकांच्या ८ बदल्या करण्यात आल्या. आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवक ५, आयोग्य सहायक २, औषध निर्माण अधिकारी, स्वास्थ अभ्यंगता यांची प्रत्येकी १ तर आरोग्य सेविकांच्या ३ बदल्या करण्यात आल्या. एका आयोग्य पर्यवेक्षकाचीही बदली केली. सामान्य प्रशासन विभागांतर्गत कनिष्ठ प्रशासन अधिकार्‍याची आपसी विनंती बदली करण्यात आली. विस्तार अधिकारी सांख्यिकी या संवर्गातील १, वरिष्ठ सहायक १४, कनिष्ठ सहायक २७, वाहन चालक १ आणि परिचरांच्या २५ बदल्या करण्यात आल्या.


** दहा वर्ष पूर्ण न झालेल्या कर्मचार्‍यांच्याही प्रशासकीय बदल्या
प्रशासकीय बदलीसाठी मुख्यालयातील सलग १0 वर्षांच्या सेवेचा काळ निर्धारित करण्यात आला होता. त्यामुळे त्यापेक्षा कमी सेवा असलेले कर्मचारी बदलीस पात्र नसल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात बदली करताना अशा कर्मचार्‍यांच्या माघारीच त्यांची बदली करण्यात आली. बदली करताना विश्वासात घेण्यात न आल्याने या कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचा सूर होता.

Web Title: Withholding the rules of excise rules of office bearers in exchange for Zilla Parishad employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.