कुजबूज--3 सद्गुरू
By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:35+5:302015-08-03T22:26:35+5:30
नगरसेवक खवळले

कुजबूज--3 सद्गुरू
न रसेवक खवळलेपणजी महापालिकेचे नगरसेवक सध्या खवळलेत. चूक त्यांची नाही. महापालिकेने जो कंत्राटदार नेमला तो सध्या लोकांना पिडतोय. पणजीत चुकीच्या ठिकाणी वाहन पार्क करणार्यांविरुद्ध कारवाई व्हायलाच हवी; पण या कंत्राटदाराची माणसे थेट चारशे रुपयांचा दंड वाहनधारकाला ठोठावतात. चारशेपैकी शंभर रुपये पोलिसांच्या वाहतूक विभागाला जातात. शंभर रुपये महापालिकेला व दोनशे रुपये कंत्राटदाराच्या खिशात जातात. आपली लुट सुरू आहे, अशी तक्रार बहुतेक वाहनधारक सध्या पणजीत करत आहेत. महापौरांकडेही लोकांच्या खूप तक्रारी येतात व नगरसेवकांकडेही वाहनधारक येऊन रडतात. महापालिकेचे विद्यमान महापौर शुभम चोडणकर यांनी हे कंत्राट दिलेले नाही. आयुक्त संजित रॉड्रिग्स यांनी ते कंत्राट दिलेय. त्या वेळी चोडणकर महापौर नव्हते. आता सुमारे वीस नगरसेवकांनी मिळून एक निवेदन महापौरांना दिले आहे.भाजपचे नगरसेवकपणजीतील भाजपचे एक-दोन नगरसेवक सध्या महापौरांवर खूपच नाराज आहेत. ते महापालिका कुठे चुकते का, महापौर कुठे चुकतात का, याचीच वाट पाहतात. महापौरांना महापालिका व्यवस्थित चालविता येत नाही, कामे करता येत नाहीत असा प्रचार असंतुष्ट नगरसेवक करतात. भाजपचा एक नगरसेवक तर माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्या कार्यालयात जाऊन स्ट्रेटेजी ठरवून आला आहे. महापौर शुभम चोडणकर यांचे आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांच्याशी चांगले संबंध आहेत आणि सिद्धार्थांचे र्पीकरांशी. त्यामुळे चोडणकरांचे आसन भक्कम. मात्र, आयुक्त संजित रॉड्रिग्स कुठच्याच महापौराला जास्त जुमानत नाहीत. ते आपण म्हणजेच महापालिका असे समजतात; कारण त्यांचेही र्पीकरांशी चांगले संबंध.