शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वायरमनने घेतला बदला...पोलीस ठाण्याची चक्क वीजच तोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 16:16 IST

वायरमनने पोलिसांना त्याच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी त्याला दंड भरायला लावला.

नवी दिल्ली : वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर वाहतूक पोलिसांनी चलन फाडल्यास बऱ्याचदा विनवणी, हुज्जत घातली जाते. काही वेळा या पोलिसांना मारहाणही केली जाते. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये तर वेगळाच किस्सा घडला आहे. तेथील वीज वितरण कंपनीच्या वायरमनने पोलिस ठाण्याचीच वीज कापत बदला घेतला आहे. यामागचे कारणही तसेच आहे. 

घडले असे की, या वायरमनला वीज वितरण कंपनीने फिरोजाबाद जिल्ह्यातील आग्रा शहराच्या शेजारचा विभाग दिला आहे. या ठिकाणी एका ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने दुरुस्तीसाठी हा वायरमन गेला होता. मोटारसायकलवरून माघारी परतताना त्याला पोलिसांनी विना हॅल्मेट पकडले आणि 500 रुपयांची पावती फाडली. 

या वायरमनने पोलिसांना त्याच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी त्याला दंड भरायला लावला. याचा बदला घेण्याच्या भावनेतून या वायरमनने चक्क त्या पोलिस ठाण्याची वीजच कापली. उप निरीक्षक रमेश चंद्रा यांनी त्याला दंड आकारला होता. या वायरमनने चंद्रा यांना त्याच्या अधिकाऱ्यांना फोन लावून दिला. त्यांनी वायरमनला माफ करण्यास सांगितले, मात्र वाहतूक पोलिसांनी त्यांना माफ केली नाही. आता वायरमन आणि त्याच्या अधिकाऱ्याने या गोष्टीचा बदला घेण्याचे ठरविले. या वायरमनने या पोलिस ठाण्याची वीजच खंडीत केली. या पोलिस ठाण्याकडून वीज वितरण कंपनीचे 6.62 लाख रुपये थकलेले आहेत. हे कारण देत वीज वितरण कंपनीने या पोलिस ठाण्याची वीजच बंद केली आहे. 

या प्रकारावरून कंपनीचा अधिकाऱी DVVNL चे रणवीर सिंह यांनी वायरमनची बाजू घेत पोलिस ठाण्याला बिल भरण्यासाठी अनेकदा नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. 2016 पासून त्यांनी एकही रुपया भरलेला नाही. अशा थकबाकीदारांमुळे कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून पगारही मिळालेला नाही. यामुळे वायरमन 500 रुपयांचे चलनही भरू शकत नाही. यामुळे कर्मचारीही संतापले आहेत. पोलिसांनीच बिल थकविल्याने त्यांची वीज कापली आहे. 

तर दुसरीकडे पोलिसांनी दावा केला आहे की, वायरमन श्रीनिवास यांना कारवाईसाठी बोलविण्यात आले होते. पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचे 1.15 कोटी रुपयांचे बिल भरलेले आहे. उर्वरित बिलही लवकरच भरण्यात येईल.

टॅग्स :electricityवीजtraffic policeवाहतूक पोलीस