हिवाळी अधिवेशन २६ नोव्हेंबरपासून
By Admin | Updated: November 9, 2015 23:03 IST2015-11-09T23:03:38+5:302015-11-09T23:03:38+5:30
बिहार निवडणूक निकालाच्या रणधुमाळीतून बाहेर पडत केंद्र सरकारने विरोधी पक्षांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनात महत्त्वाची दुरुस्ती विधेयके मंजूर करून घेण्यास सहकार्य करण्याचे आवाहन सोमवारी केले.

हिवाळी अधिवेशन २६ नोव्हेंबरपासून
नवी दिल्ली : बिहार निवडणूक निकालाच्या रणधुमाळीतून बाहेर पडत केंद्र सरकारने विरोधी पक्षांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनात महत्त्वाची दुरुस्ती विधेयके मंजूर करून घेण्यास सहकार्य करण्याचे आवाहन सोमवारी केले. बिहारमध्ये मिळालेला विजय म्हणजे संसदेत गदारोळ घालण्याचा जनादेश असल्याचे मानू नका, असेही सुचविले. संसदेचे हिवाळी अधिवेशन २६ नोव्हेंबरला सुरू होणार असून २३ डिसेंबरपर्यत चालेल. मंत्रिमंडळाच्या संसदीय व्यवहार समितीने हा निर्णय घेतला आहे. संसदीय कामकाज मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी बैठकीनंतर पत्रकारांना यासंदर्भात माहिती दिली.