विमानांचे पंख घासले े पण दुर्घटना टळली
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:02+5:302015-02-20T01:10:02+5:30
बंगळुरू : एअरो शो-२०१५ मध्ये कसरती करणार्या दोन छोट्या विमानांचे हवेत पंख घासले गेले; मात्र सुदैवाने हवेत विमानांची धडक टळली आणि मोठा अनर्थही टळला. त्यात कुणीही जखमी झाले नाही. दोन्ही विमाने सुरक्षितरीत्या उतरविण्यात वैमानिकांना यश आले.

विमानांचे पंख घासले े पण दुर्घटना टळली
ब गळुरू : एअरो शो-२०१५ मध्ये कसरती करणार्या दोन छोट्या विमानांचे हवेत पंख घासले गेले; मात्र सुदैवाने हवेत विमानांची धडक टळली आणि मोठा अनर्थही टळला. त्यात कुणीही जखमी झाले नाही. दोन्ही विमाने सुरक्षितरीत्या उतरविण्यात वैमानिकांना यश आले. टीव्ही कॅमेर्यांनी हे दृश्य टिपले असून विमानांच्या पंखांची नासधूस झाल्याचे त्यात स्पष्ट दिसत होते. बुधवारी वायुदलाच्या येलहंका तळावरील या एअर शोमध्ये ३०० वैमानिकांचा सहभाग होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. विमानांच्या कसरती बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.