एक खिडकी यंत्रणा भिवंडीत सज्ज
By Admin | Updated: September 24, 2014 00:10 IST2014-09-24T00:10:38+5:302014-09-24T00:10:38+5:30
भिवंडी पूर्व मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी संजय सरवदे यांनी एक खिडकी योजना सुरू झाली आहे.

एक खिडकी यंत्रणा भिवंडीत सज्ज
भिवंडी : भिवंडी पूर्व मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी संजय सरवदे यांनी एक खिडकी योजना सुरू झाली आहे.त्यामुळे उमेदवारांना एकाच जागी सर्वप्रकरच्या परवानग्या मिळणे सोयीचे होणार आहे.
विधानसभा निवडणूकीचे उमेदवार पितृपक्ष संपण्याची वाट पाहात आहेत. त्यादरम्यान निवडणूक यंत्रणेस आपल्या कामाचे नियोजन करण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यानिमित्ताने भिवंडी पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय सरवदे यांनी कार्यालयातील सर्व अधिकारी, पोलीस आधिकारी, मनपा अधिकारी यांची मिटींग घेतली. निवडणूक काळात उमेदवारास लागणाऱ्या विविध विभागाच्या परवानग्या एकाच जागी २४ तासांत देण्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे लाऊडस्पिकर,रॅली, सभा, मंडप आदि परवानगी उपविभागीय कार्यालयात मिळतील असे त्यांनी सांगितले. निवडणूक कार्यालयापासून १००मिटर अंतरावर वहाने उभे करून उमेदवारास सोबत केवळ चार व्यक्ती घेऊन नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहे.
तसेच नामनिर्देशन अर्जात सर्व कॉलम भरणे बंधनकारक असून कॉलम रिकामा राहिल्यास अपूर्ण अर्ज म्हणून अर्ज बाद होईल,अशी महितीही त्यांनी दिली.
(प्रतिनीधी)