पुढची मॅच जिंकण्यासाठी धोनी गुरवाकडे जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2016 13:40 IST2016-03-16T13:40:02+5:302016-03-16T13:40:02+5:30
विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारताचा पहिल्याच टी-२० सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतर सोशल मिडीयावरुन टीम इंडियाची खिल्ली उडवली जात आहे.

पुढची मॅच जिंकण्यासाठी धोनी गुरवाकडे जाणार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारताचा पहिल्याच टी-२० सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतर सोशल मिडीयावरुन टीम इंडियाची खिल्ली उडवली जात आहे.
एखादी महत्वाची घटना, निर्णय, निकालावर विनोदी अंगाने उपरोधिक टीका करण्यात अग्रेसर करणा-या सोशल मिडीयावर अशा प्रतिक्रिया पाऊस पडला आहे.
मॅसेंजिग अॅपमध्ये लोकप्रिय असलेल्या व्हॉटस अॅपवर टीम इंडियाच्या पराभवाला छगन भुजबळांना झालेली अटक आणि झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय असणा-या 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेशी जोडले आहे.
पुढची मॅच जिंकण्यासाठी उद्या धोनी गुरवा कडे जाणार, असे मॅसेज व्हॉटस अॅपवर फिरत आहे. टि्वटरवर अनेकांनी अतिआत्मविश्वास टीम इंडियाला नडल्याची भावना व्यक्त केली आहे. येणा-या दिवसात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली नाही तर, सोशल मिडीयावर यापेक्षा तिखट प्रतिक्रिया व्यक्त होऊ शकतात.