विम्बल्डन लीड
By Admin | Updated: July 6, 2015 23:51 IST2015-07-06T23:51:32+5:302015-07-06T23:51:32+5:30
सेरेना, मर्रे, वावरिंका, शारापोव्हा

विम्बल्डन लीड
स रेना, मर्रे, वावरिंका, शारापोव्हाक्वार्टर फायनलमध्येलंडन : वर्ल्ड नंबर वन सेरेना विलियम्स हिच्यासह ॲण्डी मर्रे, स्टेन वावरिंका आणि मारिया शारापोव्हा यांनी सोमवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली. विम्बल्डनमध्ये सहाव्या जेतेपदाकडे वाटचाल करणाऱ्या ३३ वर्षांच्या सेरेनाने मोठी बहीण व्हिनस विलियम्सचा ६-४, ६-३ ने पराभव केला. ऑल इंग्लंडवर हा तिचा ७६ वा विजय होता. व्हिनसवर सेरेनाचा हा २६ सामन्यातील १४ वा विजय ठरला.२०१३ चा चॅम्पियन यजमान ब्रिटेनचा ॲण्डी मर्रे याने तीन तासाहून अधिक काळ रंगलेल्या लढतीत क्रोएशियाचा २३ वा मानांकित इवो कार्लीविचवर ७-६, ६-४, ५-७, ६-४ ने विजय नोंदविला. फ्रेंच ओपन चॅम्पियन स्वित्झर्लंडचा स्टेन वावरिंका याने बेल्जियमचा १६ वा मानांकित डेव्हिड गोफीन याच्याविरुद्ध पहिल्या दोन सेटमध्ये घाम गाळल्यानंतर ७-६, ७-६, ६-४ ने विजय संपादन केला.