शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबुडव्या विजय माल्ल्या तिस-यांदा विवाहबंधनात अडकणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 09:07 IST

बँकांचे तब्बल 9 हजार कोटी बुडवून देशाबाहेर पलायन केलेला किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय माल्ल्या आता  तिस-यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. विजय माल्ल्या त्याची गर्लफ्रेंड पिंकी लालवानीसोबत लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. 

ठळक मुद्देविजय माल्ल्या आता  तिस-यांदा विवाहबंधनात अडकणार गर्लफ्रेंड पिंकी लालवानीसोबत लग्नाच्या बोहल्यावर चढणारपिंकी लालवानी एअरहोस्टेस म्हणून कार्यरत होती.

मुंबई : बँकांचे तब्बल 9 हजार कोटी बुडवून देशाबाहेर पलायन केलेला किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय माल्ल्या आता  तिस-यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. विजय माल्ल्या त्याची गर्लफ्रेंड पिंकी लालवानीसोबत लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून विजय माल्ल्या आणि पिंकी लालवानी एकत्र राहत आहेत. त्या दोघांची भेट 2011 मध्ये झाली होती. विजय माल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्समध्ये पिंकी लालवानी एअरहोस्टेस म्हणून कार्यरत होती. तेव्हापासून त्या दोघांची जवळीक वाढली होती. मात्र, विजय माल्ल्या देशाबाहेर पळून गेल्यानंतर लंडनला त्याच्यासोबत पिंकी लालवानी सतत दिसायची. तसेच, दोघे काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची चर्चा होत होती. विजय माल्ल्याचे पहिले लग्न 1986 मध्ये झाले होते. त्यावेळी त्याने समीरा तयाबजीसोबत केले होते. ती सुद्धा एअरहोस्टेस होती. मात्र, या दोघांच लग्न जास्त काळ टिकलं नाही. विजय माल्ल्याने समीरा तयाबजीशी घटस्फोट घेतला. त्यानंतर त्याने 1993 मध्ये रेखा माल्ल्याशी दुसरे लग्न केले.  रेखा अजूनही कायदेशीररित्या त्याची पत्नी आहे.

विजय माल्ल्याचे पलायन ... विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह 17 बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल 9000 करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. विजय माल्याला देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 17 सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र विजय माल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाला होता.

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्या