शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
2
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
3
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
4
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
5
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
6
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
7
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
8
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
9
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
10
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
11
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
12
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
13
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
14
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
15
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
16
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
17
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
18
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
19
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
20
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष

मोबाईल वॉलेटचा ट्रेंड कधीपर्यंत टिकणार ?

By admin | Updated: January 5, 2017 23:03 IST

मोबाईल आता प्रत्येकाच्या हातात असून, दैनंदिन व्यवहारही ब-याचदा मोबाईलवरूनच केले जातात.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - मोबाईल आता प्रत्येकाच्या हातात असून, दैनंदिन व्यवहारही ब-याचदा मोबाईलवरूनच केले जातात. मोबाईल वॉलेटही आता वापरकर्त्यांसाठी जीवनाचा एक भाग बनलं आहे. अनेकदा लोक कोणत्या ना कोणत्या कारणास्तव मोबाईल वॉलेटचा वापर करतात. मोबाइलच्या माध्यमातूनच फोन रिचार्ज, टॅक्सीचं बिल भरणं अशी कामे करतात. मोबाइल वॉलेटमुळे बँकेच्या बाहेर रांग न लावता स्वतःची सर्व कामे होतात. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, यूएसएसडी, आधार कार्डवर आधारित भीम अ‍ॅप्लिकेशन लोकांच्या सेवेत आहेत. ई-वॉलेटमुळे बिल भरणं, तिकीट बुक करणं, कॅबचं पेमेंट करणं सर्वकाही सहजशक्य झालं आहे. मोबाईलमध्ये पेटीएम, फ्रीचार्ज, मोबिक्विक, एअरटेल मनी, व्होडाफोन एम-पैसा, ऑक्सिजन वॉलेट, चिल्लर, पेयूमनी असे अनेक ई-वॉलेट कार्यरत आहेत. या सर्व अ‍ॅप्समध्ये पेटीएम हे सध्या आघाडीवर आहे. पेटीएमच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक, होम अप्लायन्स, फूटवेअर आणि कॅशबॅकसारखे ऑफरचाही आपण फायदा घेऊ शकतो. ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला आता यूनिफाईड पेमेंट इंटरफेस प्रणालीही वापरता येणार आहे. ही नवी प्रणाली एनपीसीआयने विकसित केली आहे. यूपीआयमार्फत पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला स्मार्टफोनवर यूपीआय अ‍ॅप इन्स्टॉल करावं लागत असून, मोबाईल नंबरची नोंद करावी लागते. त्यासाठी तुम्हाला आधार नंबर देणंही गरजेचं असेल. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर बँकेकडून यूनिक यूपीआय कोड पाठवला जाणार आहे. तसेच हा नंबर म्हणजे तुमच्या बँकेचा पत्ता स्वरुपात असणार आहे. तुम्हाला ज्या बँकेत पैसे पाठवायचे आहेत, त्याचाही यूपीआय नंबर तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. समोरच्या व्यक्तीकडेही यूपीआयशी जोडलेल्या कोणत्याही बँकेचं अ‍ॅप असणं गरजेचं आहे. तुम्हाला ई-कॉमर्स कंपनीचा यूनिक आयडी नंबर द्यावा लागेल. याशिवाय याच्या माध्यमातून तुम्ही फोन बिल, गॅस बिल, मोबाईल फोन रिचार्ज आदींचे पेमेंट करणे शक्य होणार आहे. मात्र याचे काही तोटेही आहेत. ही मोबाईल वॉलेट कितीपत सुरक्षित आहेत हाच खरा प्रश्नच आहे. मोबाईल हरवल्यास डेटा चोरी होण्याची भीती असते, तर बॅलन्स ट्रान्सफर होण्याचीही शक्यता असते. या यूपीआय प्रणालीच्या सुरक्षेबाबतही अनेक जाणकारांनी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे मोबाईल वॉलेट किती सुरक्षित आहे, हे येत्या काळातच समजणार आहे.