शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
6
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

दक्षिणेतील काँग्रेसचा ‘हा’ बालेकिल्ला राहणार शाबूत?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 6:14 AM

तिरंगी लढत : कार्ती चिदंबरमसमोर अण्णाद्रमूकचे आव्हान

असिफ कुरणेचेन्नई : तामिळनाडूतील शिवगंगा मतदारसंघ हा  माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला बनवला आहे. २०१४ चा अपवाद वगळता येथे सात वेळा चिदंबरम विजयी झाले आहेत.  २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा मुलगा कार्ती पी. चिदंबरम यांनी मोठ्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकली होती. आतापर्यंत आठ वेळा काँग्रेसने ही जागा जिंकली आहे तर दोन वेळा अण्णाद्रमूक पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे. 

यावेळी या मतदारसंघात काँग्रेस, अण्णाद्रमुक, भाजप अशी तिरंगी लढत होत आहे.  कार्ती यांना यावेळी  आण्णा द्रमूकच्या झेविअर दास व भाजपच्या डॉ. देवनाथन यादव यांचे तगडे आव्हान आहे. शिवगंगामध्ये चेट्टीयार या व्यापारी समाजाचे प्रभूत्व असून त्याचे मतदान १० टक्केपेक्षा जास्त आहे.  २०१४ च्या निवडणुकीत कार्ती चिदंबरम चौथ्या नंबरवर फेकले गेले होते.  त्यानंतर त्यांनी पुनरागमन करत २०१९ ला विजय मिळवला.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

या मतदारसंघात निवडणूक लढवत असलेले तिन्ही प्रमुख पक्षाचे उमेदवार करोडपती असून भाजपच्या देवनाथन यादव यांनी ३०० कोटी रुपयांची संपत्ती  जाहीर केली आहे.  मतदारसंघात वस्रोद्योग, राईस मिल, ग्राफाईट मायनिंग, कृषी उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. मात्र जीएसटीमुळे वस्त्रोद्योग, राईस मिलचे कंबरडे मोडले आहे. द्रमूक सरकारकडून देखील त्यात फारशी सुधारणा झालेली नाही.  स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नाही. राईस मिल, इतर उद्योगात युपी, बिहारची मुले कमी पैशावर काम करतात. त्याचा फटका स्थानिक युवकांना बसत आहे. याबाबत मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. 

 २०१९ मध्ये काय घडले?कार्ती पी. चिदंबरम    काँग्रेस (विजयी)    ५,६६,१०४ एच. राजा    भाजप    २,३३,८६० व्ही. पांडी    अपक्ष    १,२२, ५३४व्ही. शक्तीप्रिया    एनटीके    ७२,२४०   

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?

वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते         टक्के२०१४    पीआर. सेन्थलीनाथन             अण्णाद्रमूक    ४,७५, ९९३   ४७%२००९    पी. चिदंबरम    काँग्रेस        ३,३४,३४८    ४३%२००४    पी. चिदंबरम     काँग्रेस         ४,००,३९३    ६०%१९९९    सुदर्शना नच्चीपन    काँग्रेस        २,४६,०७८    ४०%१९९८    पी. चिदंबरम    ता.म. काँग्रेस        ३,०३,८५४       ५१ %

टॅग्स :Tamil Nadu Lok Sabha Election 2024तामिळनाडू लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसP. Chidambaramपी. चिदंबरम