शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 07:01 IST

Haryana Political Crisis: भाजपचे नायब सिंह सैनी सरकार अडचणीत, आधीच लोकसभेच्या जागावाटपावरून जेजेपीसोबतची युती भाजपाने तोडली होती. त्यांचे १० आमदार होते ते सत्तेतून बाहेर पडले होते.

बलवंत तक्षकलोकमत न्यूज नेटवर्कचंडीगड : लोकसभा निवडणुकीपूर्वी हरयाणातील तीन अपक्ष आमदारांनी नायब सिंह सैनी सरकारला मोठा धक्का दिला आहे. नीलोखेडीचे आमदार धर्मपाल गोंदर, दादरीचे आमदार सोमवीर सिंह सांगवान आणि पुंडरीचे आमदार रणधीर सिंह गोलन यांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढला व ते काँग्रेससोबत गेले आहेत. राज्य सरकारकडून उपेक्षा होत असल्याने पाठिंबा काढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

बादशाहपूरचे अपक्ष आमदार राकेश दौलताबाद पत्रकार परिषदेला येणार असल्याची चर्चा होती. मात्र, ते रोहतकला पोहोचले नाहीत. अपक्ष आमदार बलराज कुंडू हेही भाजप सरकारसोबत नाहीत. आधीच लोकसभेच्या जागावाटपावरून जेजेपीसोबतची युती भाजपाने तोडली होती. त्यांचे १० आमदार होते ते सत्तेतून बाहेर पडले होते. यानंतर भाजपाने नवीन मुख्यमंत्री राज्याला दिले होते. हरयाणामध्ये २५ मे रोजी सर्व जागांवर लोकसभा निवडणूक होत आहे. यापूर्वीच भाजप अल्पमतात आल्याने तेथील वारे काँग्रेसच्या दिशेने फिरण्याची शक्यता आहे.

पक्षीय बलाबलसदस्य संख्या ९० विद्यमान आमदार ८८ बहुमतासाठी आवश्यक ४५ भाजपकडे ४३ आमदार (भाजपचे ४० आणि २ अपक्ष व हलोपाच्या एका आमदाराचा पाठिंबा.)काँग्रेसकडे ३३ आमदार (काँग्रेसचे ३० आणि तीन अपक्ष)

राष्ट्रपती राजवट लागू करा : भूपेंद्र सिंह हुड्डाराज्यातील भाजप सरकार अल्पमतात आले आहे. राज्याचा कारभार चालविण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी. अशी मागणी विरोधी पक्षनेते भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी मंगळवारी केली आहे.

टॅग्स :haryana lok sabha election 2024हरियाणा लोकसभा निवडणूक निकाल २०२४HaryanaहरयाणाBJPभाजपाcongressकाँग्रेस