शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानपदासाठी शिवसेना देणार भाजपाच्या 'या' नेत्याला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 12:34 IST

लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही, असा शिवसेनेचा अंदाज आहे.

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही. अशा परिस्थितीत पंतप्रधान पदासाठी नितीन गडकरींचं नाव पुढे आल्यास शिवसेना त्यांना पाठिंबा देईल, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. एका इंग्रजी वृत्तपत्राला राऊत यांनी मुलाखत दिली. त्यात त्यांनी भाजपासोबत युती करणार नसल्याचा पुनरुच्चार केला. शिवसेनेच्या शब्दकोषात युती हा शब्द नाही, असं राऊत म्हणाले. भाजपा केवळ स्वत:चा विचार करते. त्यामुळे आम्हीदेखील आता फक्त आमचा विचार करतो, असं म्हणत राऊत यांनी शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत नेमकं काय होईल, याचं भाकीत राऊत यांनी वर्तवलं. येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही. पुढची लोकसभा त्रिशंकू असेल. अशा परिस्थितीत नितीन गडकरी पुढील सरकारचं नेतृत्त्व करू शकतात, असं राऊत यांनी म्हटलं. याआधीही संजय राऊत यांनी सामनामधील लेखात गडकरी पंतप्रधान होऊ शकतात, असं भाकीत वर्तवलं होतं. यानंतर गडकरींनी आपल्याला पंतप्रधान होण्याची इच्छा नसल्याचं म्हटलं होतं. शिवसेनेनं गेल्या पाच वर्षांमध्ये अनेकदा नरेंद्र मोदींच्या विरोधात भूमिका घेतली आहे. राफेल विमान खरेदी प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्याची मागणी राहुल यांनी केली. यावेळी शिवसेनेनंही संयुक्त संसदीय समितीमार्फत राफेल कराराची चौकशी करण्याची मागणी करत भाजपाची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला. रोजगार, काळा पैसा, काश्मीर प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवरुन शिवसेनेनं कायम मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNitin Gadkariनितीन गडकरीNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानBJPभाजपाShiv Senaशिवसेना