शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नव्या संसद भवनात पंडित नेहरूंचा पुतळा लावणार का? समिती घेईल निर्णय, मात्र तिची नियुक्तीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 08:49 IST

Pandit Jawaharlal Nehru: पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची प्रतिमा वा पुतळा नव्या संसद भवनात लागणार का, आणखी कोणाचे पुतळे वा प्रतिमा तिथे लावणार, याचा निर्णय लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखालील समिती घेणार असली तरी ती स्थापनच झालेली नाही.

- शरद गुप्ता 

नवी दिल्ली : पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची प्रतिमा वा पुतळा नव्या संसद भवनात लागणार का, आणखी कोणाचे पुतळे वा प्रतिमा तिथे लावणार, याचा निर्णय लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखालील समिती घेणार असली तरी ती स्थापनच झालेली नाही.

पं. नेहरूंच्या जयंतीच्या संसद भवनातील कार्यक्रमाला लोकसभाध्यक्ष, राज्यसभा अध्यक्ष वा केंद्रीय मंत्री  हजर नव्हते. दिल्लीत नसल्याने पं. नेहरू जयंती कार्यक्रमास हजर नव्हतो, असे बिर्ला म्हणाले. नव्या संसद भवनात ठराविक विचारांच्या नेत्यांचेच  पुतळे वा प्रतिमा लावण्यात येतील, अशी चर्चा सुरू आहे. त्यावर पुतळे व प्रतिमांबाबत समितीच निर्णय घेईल. त्यात लोकसभेचे आठ व राज्यसभेचे चार सदस्य असतील, असेही त्यांनी सांगितले. नव्या संसद भवनाचे काम वेळेत पूर्ण होईल, असा दावाही त्यांनी केला.

संसद भवन वा सेंट्रल हॉलमध्ये जागाच नसल्याने आणखी नेत्यांचे पुतळे वा प्रतिमांचे काय करायचे, हे ठरवण्यासाठी  समितीची नियुक्ती २००० साली झाली होती.  त्यानंतर मीरा कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ४ ऑगस्ट २००९ रोजी समिती स्थापन झाली. त्यात लालकृष्ण अडवाणी, सुशीलकुमार शिंदे, अरुण जेटली, ऑस्कर फर्नांडिस, डॉ. करण सिंह, सीताराम येचुरी, आदी सदस्य होते. त्या समितीची एकच बैठक झाली. 

वाजपेयींच्या प्रतिमेचा निर्णय त्यानंतर १६ व्या लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक १८ डिसेंबर २०१८ रोजी झाली. त्यात संसद भवनात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमा लावण्याचा निर्णय झाला.

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूParliamentसंसद