शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

'राहुलजी, विमान पाठवतो, स्वत: येऊन काश्मीरमधील स्थिती पाहा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 09:12 IST

जम्मू काश्मीरच्या राज्यपालांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

जम्मू: कलम 370 वरुन काँग्रेस-भाजपामध्ये अद्यापही शाब्दिक युद्ध सुरुच आहे. काश्मीरमधील परिस्थितीवरुन भाजपाला लक्ष्य करणारे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल यांनी काश्मीर खोऱ्याचा दौरा करावा. परिस्थितीचा आढावा घ्यावा. त्यासाठी आम्ही विशेष विमान पाठवतो, असं मलिक यांनी म्हटलं. जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात जम्मू-काश्मीरमध्ये काय चाललं आहे, याची माहिती पंतप्रधान मोदींनी देशाला द्यावी, असं आव्हान राहुल यांनी दिलं होतं. त्याला मलिक यांनी प्रत्युतर दिलं. सांप्रदायिक दृष्टीकोनातून कलम 370 हटवण्यात आलेलं नाही. त्यामुळे मी राहुल गांधींना काश्मीरमध्ये येण्याचं निमंत्रण देतो. त्यासाठी मी विमानदेखील पाठवेन. तुम्ही स्वत: परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि मगच बोला. तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात. त्यामुळे अशा प्रकारची बेजबाबदार विधानं तुम्हाला शोभत नाहीत, असं मलिक म्हणाले. जम्मू-काश्मीरमध्ये हिंसेच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मोदींनी पारदर्शकपणा दाखवून या प्रकरणी चिंता व्यक्त करायला हवी, अशी मागणी राहुल यांनी शनिवारी केली होती. कोणत्याही सांप्रदायिक दृष्टीकोनातून जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्यात आलेलं नाही. कलम 35 ए आणि कलम 370 मधील बहुतांश तरतुदी सर्वांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. लेह, कारगिल, जम्मू, राजौरी, पूँछ असो वा काश्मीर या निर्णयामागे कोणताही सांप्रदायिक दृष्टीकोन नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याप्रकरणी काल माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली होती. जर जम्मू-काश्मीर हिंदूबहुल राज्य असते तर या राज्याचा विशेष दर्जा भगवा पार्टीने काढला नसता, असे पी. चिदंबरम म्हणाले होते. भाजपाने बळाच्या जोरावर जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केला. जम्मू-काश्मीर सध्या अस्थिर आहे आणि आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था त्याबाबत वृत्तांकन करत आहेत. परंतु, भारतातील प्रसारमाध्यमं जम्मू-काश्मीरमधील वृत्तांकन करताना दिसत नाहीत. काश्मीरमधील परिस्थिती निवळल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. जर भारतीय प्रसारमाध्यमं काश्मीरमधील अस्थिरतेचं वृत्तांकन करत नसतील तर याचा अर्थ तेथील परिस्थिती स्थिर आहे असा होतो का? असा सवालही पी. चिदंबरम यांनी केला. .  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Rahul Gandhiराहुल गांधी