राममंदिरावरील जीर्ण आच्छादन हटविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2015 02:38 IST2015-08-11T02:38:31+5:302015-08-11T02:38:31+5:30
अयोध्येत वादग्रस्त स्थळी तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या मंदिराची जीर्ण ताडपत्री असलेले आच्छादन, दोर आणि अन्य साहित्य बदलवून त्याऐवजी नवे लावण्याला सर्वोच्च न्यायालयाने

राममंदिरावरील जीर्ण आच्छादन हटविणार
नवी दिल्ली : अयोध्येत वादग्रस्त स्थळी तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या मंदिराची जीर्ण ताडपत्री असलेले आच्छादन, दोर आणि अन्य साहित्य बदलवून त्याऐवजी नवे लावण्याला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी परवानगी दिली.
जुनी ताडपत्री, ज्यूटचे मॅटिंग, बांबू, पॉलिथीन शीट आणि दोर बदलवून त्याऐवजी त्याच आकाराचे आणि दर्जाचे नवे साहित्य आधीच्याच पद्धतीने वापरण्याला आम्ही फैजाबादच्या आयुक्तांना अधिकृत व्यक्ती म्हणून आदेश देत आहोत. दोन निरीक्षकांच्या देखरेखीखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जावी, असे टी.एस. ठाकूर यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)