शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CAA: एकाही मुस्लिमाचं नागरिकत्व गेल्यास राजीनामा देईन; भाजपा आमदार आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 09:31 IST

भाजपाच्या आमदाराचं मतदारसंघातील मुस्लिम समुदायाला आश्वासन

गोरखपूर: सुधारित नागरिकत्व कायद्यांतर्गत (सीएए) माझ्या मतदारसंघातील एकाही मुस्लिम व्यक्तीला देशातून बाहेर काढल्यास आमदारकीचा राजीनामा देईन, असा आक्रमक पवित्रा भाजपा नेते डॉ. राधा मोहन दास अग्रवाल यांनी घेतला आहे. अग्रवाल २००२ पासून उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. सीएएशी संबंधित अफवांचं निराकरण करण्यासाठी अग्रवाल यांनी त्यांच्या मतदारसंघातील मुस्लिमांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यावेळी त्यांनी सीएएबद्दलची भूमिका स्पष्ट केली. मतदारसंघातल्या संपर्क कार्यक्रमादरम्यान अग्रवाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'गोरखपूरमधील एकाही मुस्लिम व्यक्तीचं नागरिकत्व काढून घेण्याचा प्रयत्न झाल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईन, हा विश्वास देण्यासाठी मी मुस्लिम समुदायाच्या गाठीभेटी घेत आहे. सीएएमुळे मुस्लिमांचं नागरिकत्व रद्द करुन घेण्यात येईल अशी माहिती समुदायाच्या मनात आहे का, ते जाणून घेण्याचा प्रयत्न संपर्क कार्यक्रमादरम्यान करण्यात येत आहे,' अशी माहिती अग्रवाल यांनी दिली. सीएए संदर्भात मुस्लिम नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं अग्रवाल म्हणाले. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये अत्याचार सहन कराव्या लागल्यानं भारतात आलेल्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याची तरतूद सीएएमध्ये आहे. तीच बाब संपर्क कार्यक्रमातून नागरिकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठी भाजपाकडून जनसभा घेतल्या जात आहेत.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपा