शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

प्रॉव्हिडंट फंडाचे व्याज दिवाळीपूर्वीच जमा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 08:34 IST

सूत्रांनी सांगितले की, २०२०-२१ या वित्त वर्षात ईपीएफवर ८.५ टक्के व्याज दर देण्यास ईएफओच्या केंद्रीय बोर्डाने मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देसूत्रांनी सांगितले की, २०२०-२१ या वित्त वर्षात ईपीएफवर ८.५ टक्के व्याज दर देण्यास ईएफओच्या केंद्रीय बोर्डाने मंजुरी दिली आहे

नवी दिल्ली : वेतनधारी लोकांचा सणासुदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी वित्त वर्ष २०२१ चे कर्मचारी भविष्य निधीवरील (ईपीएफ) व्याज येणाऱ्या दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची तयारी कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ)  चालविली आहे.एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई दिलासा वाढ देण्यात येणार आहे. त्यासोबतच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर ईपीएफचे व्याजही जमा होण्याचा योग जुळून येत आहे. कोविड-१९ साथीमुळे रोजगार गमवावा लागलेल्या, तसेच वेतन कपात सहन कराव्या लागलेल्या वेतनधारी कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळेल.

सूत्रांनी सांगितले की, २०२०-२१ या वित्त वर्षात ईपीएफवर ८.५ टक्के व्याज दर देण्यास ईएफओच्या केंद्रीय बोर्डाने मंजुरी दिली आहे. या प्रस्तावास आता वित्त मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले असून, ती लवकरच मिळेल, अशी अपेक्षा आहे. ८.५ टक्के हा व्याज दर निश्चित करण्यापूर्वी अनेक घटक विचारात घेण्यात आले आहेत. सूत्रांनी सांगितले की, वित्त मंत्रालयाची मंजुरी हा केवळ औपचारिकतेचा भाग आहे, असे अनेक जण मानतात. तथापि, वित्त मंत्रालयाच्या मंजुरीशिवाय ईपीएफओ व्याज दर सदस्यांच्या खात्यावर जमा करू शकत नाही. मार्चमध्ये ईपीएफओच्या बोर्डाने ८.५ टक्के व्याज दर देण्याचा निर्णय घेतला होता. आदल्या वित्त वर्षात ईपीएओला ७०,३०० कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे. यातील ४ हजार कोटी रुपये संस्थेला आपल्या समभागातील गुंतवणुकीची विक्री करून मिळाले आहेत. आमच्या बोर्डाच्या शेवटच्या बैठकीनंतर शेअर बाजार उत्तमरीत्या वाढला आहे. आम्हाला शेअर बाजारातून चांगले उत्पन्न मिळाल्यामुळे आम्हाला मोठा आधार झाला आहे.

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीDiwaliदिवाळी