देशाची मान झुकू देणार नाही- राजनाथ सिंह

By Admin | Updated: October 4, 2016 17:07 IST2016-10-04T17:07:42+5:302016-10-04T17:07:42+5:30

देशाची मान कोणत्याही परिस्थितीत झुकू देणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे.

Will not let the neck of the country shrink- Rajnath Singh | देशाची मान झुकू देणार नाही- राजनाथ सिंह

देशाची मान झुकू देणार नाही- राजनाथ सिंह

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 4 - देशाची मान कोणत्याही परिस्थितीत झुकू देणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. राजनाथ सिंह यांनी आज कारगिलला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, आमची सेना पाकिस्तानला योग्य उत्तर देते आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी उत्तर देण्याची गरज नाही. बीएसएफच्या धडक कारवाईवर केंद्र सरकार संतुष्ट आहे.

भारत-पाक नियंत्रण रेषेवरील प्रत्येक हालचालींवर पंतप्रधान स्वतः जातीनं लक्ष ठेवून आहेत. आमचं लष्करही पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देते आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये भारताच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सतत गोळीबार केला जातो आहे.

पाकिस्तानकडून होणा-या शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सावध प्रतिक्रिया दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लवकरच सर्व काही ठीक होईल, असं म्हटलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर ही सर्जिकल स्ट्राइकची कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे.

Web Title: Will not let the neck of the country shrink- Rajnath Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.