शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

सीएएला पाठिंबा देणाऱ्या 'त्या' मुख्यमंत्र्याचा भाजपाला दे धक्का; राज्यात एनआरसी लागू न करण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 19:21 IST

एनआरसीवरुन भाजपाला जोरदार धक्का

पाटणा: सुधारित नागरिकत्व कायद्याला पाठिंबा देणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबद्दल मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी लागू होणार नसल्याचं मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजपा सत्तेत असल्यानं नितीश कुमार यांचं विधान महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.संयुक्त जनता दलानं सुधारित नागरिकत्वाला पाठिंबा दिल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांना धक्का बसला. या मुद्द्यावरुन पक्षातील मतभेददेखील समोर आले. संयुक्त जनता दलाच्या अनेक नेत्यांनी कुमार यांच्या भूमिकेबद्दल असहमती दर्शवली. त्यामुळेच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबद्दल नितीश कुमार कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं होतं. संपूर्ण देशात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) राबवली जाईल, या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या विधानाबद्दल आज नितीश कुमार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कसला एनआरसी, असं म्हणत कुमार यांनी पत्रकारांना प्रतिप्रश्न केला. बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नाही, असंदेखील ते पुढे म्हणाले. सध्या देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात वातावरण तापलं असताना नितीश कुमार यांनी एनआरसीबद्दलची भूमिका स्पष्ट केली. काही दिवसांपूर्वीच या संदर्भात पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी नितीश यांची भेट घेतली होती. बिहारमध्ये एनआरसी लागू होणार नाही, असा विश्वास किशोर यांनी या भेटीनंतर व्यक्त केला होता. सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल पक्षानं घेतलेल्या भूमिकेवर किशोर अतिशय नाराज होते.  

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNitish Kumarनितीश कुमार