शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

'शाल अन् फुले स्विकारणार नाही, पण..; CM पदाची शपथ घेताच सिद्धरमैय्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 08:47 IST

बंगळुरू येथील कांतीराव स्टेडियमवर कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाचा शपथग्रहण सोहळा पार पडला.

बंगळुरू - एखाद्या पाहुण्याच्या स्वागताला किंवा सन्माननीय व्यक्तीच्या सत्कारासाठी शाल, फूल, नारळ देण्याची प्रथाच पडली आहे. त्यामध्ये, राजकीय नेते, अधिकारी वर्ग किंवा आमदार, खासदार, मंत्री यांच्या स्वागताला फुलांचे मोठा बुके देऊन त्यांचं स्वागत केलं जात. मात्र, काही वेळातंच तो बुके किंवा तो हार वेस्ट (कचर) होऊन जातो. मग, हजारो रुपयांची उधळण कशासाठी असा प्रश्न अनेकदा सर्वसामान्यांना पडतो. आता, कर्नाटक राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांनी याबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. यापुढे आपण स्वागतासाठी बुके, फुले किंवा शाल स्वीकारणार नसल्याचं त्यांनी ठरवलं आहे. 

बंगळुरू येथील कांतीराव स्टेडियमवर कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाचा शपथग्रहण सोहळा पार पडला. यावेळी, राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्र्यांसह आमदारांना पदाची शपथ दिली. सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली, तर डीके शिवकुमार यांनी एकमेव उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी, काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि राज्यपालांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देण्यात आले. तसेच, अनेकांनी हार, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कारही केला. मात्र, यापुढे आपण पुष्पगुच्छ, हार, शाल स्वीकारणार नसल्याचे सिद्धरमैय्या यांनी ट्विटर अकाऊंटवरुन जाहीर केले आहे.  यापुढे पुष्पगुच्छ, हार किंवा शाल न स्वीकारण्याचा निर्णय मी घेतला आहे. माझ्या वैयक्तिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील कार्यक्रमांसाठीही हे लागू असणार आहे. सहसा आदरातिथ्याचे प्रतिक म्हणून प्रेमापोटी लोकांकडून ते दिलं जातं. मात्र, भेटवस्तूंच्या रूपात आपण प्रेम आणि आदर व्यक्त करू इच्छित असल्यास मला हार-शाल याऐवजी पुस्तके देऊ शकता, असेही मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांनी म्हटले आहे. तसेच, तुमचे प्रेम आणि स्नेह सदैव माझ्यावर असेच राहू द्या, असेही सिद्धरमैय्या यांनी म्हटलंय. 

दरम्यान, काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकी स्पष्ट बहुमत मिळालं असून १३५ जागांसह एकहाती सत्ता आल्याने काँग्रेसने सरकार स्थापन केलं आहे. त्यात, मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. डीके शिवकुमार हेही मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसले होते. अखेर, पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानंतर सिद्धरमैय्या यांचं नाव निश्चित झालं अन् त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांदा शपथ घेतली.  

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीKarnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटकministerमंत्री