एस. पी. सिन्हालोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांना राज्यसभेत पाठवले जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर निशांत राज्यसभेवर जात नसतील, तर नितीश कुमार स्वतः वरिष्ठ सभागृहात जाऊ शकतात.
प्राप्त वृत्तानुसार, निशांत कुमार यांना बिहारचे उपमुख्यमंत्री नियुक्त केले जाऊ शकते. जेडीयू राज्यसभेच्या दोन जागी उमेदवार उभे करणार आहे. यासाठी रामनाथ ठाकूर यांच्यासह नितीश कुमार यांचे नाव चर्चेत आहे.
जेडीयूचे विधान परिषदेचे सदस्य संजय कुमार म्हणाले की, आमच्याकडे पक्षाच्या उमेदवाराबद्दल कोणतीही माहिती नाही. केंद्रीय मंत्री रामनाथ ठाकूर त्यांची जागा कायम ठेवू शकतात. दुसऱ्या जागेबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील.
म्हणे, ‘ही तर होळीची गंमत’ही चर्चा म्हणजे निव्वळ होळीची गंमत आहे, असे केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे. नितीशकुमार मुख्यमंत्री राहतील, असे त्यांनी म्हटले आहे.
Web Summary : Speculation arises: Nitish Kumar may enter Rajya Sabha, possibly replacing his son. JDU eyes two Rajya Sabha seats. BJP dismisses the rumors as a 'Holi joke,' asserting Nitish will remain Chief Minister.
Web Summary : कयास: नीतीश कुमार राज्यसभा जा सकते हैं, शायद अपने बेटे की जगह। जेडीयू को दो राज्यसभा सीटें मिलने की उम्मीद। भाजपा ने अफवाहों को 'होली का मज़ाक' बताया, नीतीश के मुख्यमंत्री बने रहने की बात कही।