शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मोदी डोकलाम प्रश्नावरून चीनशी रोखठोक बोलण्याची हिंमत दाखवतील का? काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 11:46 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीन दौऱ्यावर असून, तेथे ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करणार आहे. मात्र या भेटीपूर्वीच काँग्रेसने मोदींवर घाणाघात करत प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

 नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीन दौऱ्यावर असून, तेथे ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करणार आहे. मात्र या भेटीपूर्वीच काँग्रेसने मोदींवर घाणाघात करत प्रश्नांची सरबत्ती केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या भेटीदरम्यान होणाऱ्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या रणनीतिक हितांचे रक्षण करून डोकलामबाबत चीनकडे रोखठोक विचारणा करतील का? अशी विचारणा केली आहे. सुरजेवाला म्हणाले की भारत सध्या चीनच्या आक्रमक आणि विस्तारवादी धोरणाचा सामना करत आहे. "चीन सिलीगुडी कॉरिडॉरमध्ये डोकलामच्या दक्षिणेस चिकन नेक जवळ एक नवा रस्ता बांधत आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना याची गंधवार्ता नसल्याचेच दिसत आहे. ते चीनला कठोर संदेश का देऊ शकत नाहीत, कुणास ठावूक."सुरजेवाला यांनी यासंदर्भात एक सॅटेलाइट फोटोही ट्विट केला आहे. " हे छायाचित्र 25 एप्रिल 2018 चे असून, हे छायाचित्र सांगते की भारतीय लष्करी तळापासून काही मीटर अंतरावर चीनने बांधकाम केले आहे. याविरोधात पंतप्रधान आणि संरक्षण मंत्रालयाने याची दखल घेतली आहे का? मोदी आज होणाऱ्या मुळाखतीत चिनी राष्ट्राध्यक्षांसमोर हा प्रश्न उपस्थित करणार का? मोदी डोकलाम मुद्द्यावर भारताचे हित विचारात घेऊन चीनसोबत रोखठोक चर्चा करण्याची हिंमत दाखवणार का?" असे सवाल सुरजेवाला यांनी केले आहेत.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी रात्री उशिरा चीनच्या मध्यवर्ती भागांत असलेल्या वुहान शहरात पोहोचले आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यात 24 तासात सहा वेळा मोदी व जिनपिंग यांच्यात बैठका होणार आहेत. मोदी व जिनपिंग यांच्याच होणाऱ्या बैठकींमधील दोन महत्त्वाच्या बैठकांमध्ये दोन्ही देशातील सहा-सहा सदस्यांचं शिष्टमंडळही सहभागी होणार आहे. शुक्रवारी या दोन्ही बैठका पार पडणार आहेत. यातील पहिली भेट ही हुवई प्रॉर्विस म्युझियममध्ये होईल. तर दुसरी बैठक इस्ट लेक किनाऱ्याच्या गेस्ट हाऊसमध्ये होइल. यानंतर रात्री जेवणाच्या दरम्यानही दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार,या बैठकीला उच्चस्तरीय चर्चा म्हणणं चुकीचं ठरेल. या बैठकीसाठी विशिष्ट मुद्दे ठरले नाहीत. आतंकवाद, सीमा वाद असे काही मुद्देही यामध्ये असतील. या अनौपचारिक संवादादरम्यान कुठल्याही करारावर हस्ताक्षर होणार नाही, हे आधीच ठरलेलं आहे. शनिवारी मोदी व जिनपिंग यांच्यात 3 बैठका होणार आहेत. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसchinaचीनDoklamडोकलाम