झोपडप˜्या ठेवून महापालिका करणार काय?

By Admin | Updated: September 20, 2015 00:53 IST2015-09-20T00:53:47+5:302015-09-20T00:53:47+5:30

पुणे: झोपडप˜ी पुर्नवसन योजनेतंर्गत हिराबागेतील भूखंड खासगी विकसकाला देण्याचा महापालिकेचा निर्णय योग्यच आहे, वर्षानुवर्षे अशा जागांवर झोपडप˜्याच ठेवून महापालिकेला शहराचे काय करायचे आहे असा प्रश्न धनकवडी येथील महापालिका प्रभाग समितीचे सदस्य ज्ञानेश्वर दारवटकर यांनी विचारला आहे.

Will the municipality keep the slum? | झोपडप˜्या ठेवून महापालिका करणार काय?

झोपडप˜्या ठेवून महापालिका करणार काय?

णे: झोपडप˜ी पुर्नवसन योजनेतंर्गत हिराबागेतील भूखंड खासगी विकसकाला देण्याचा महापालिकेचा निर्णय योग्यच आहे, वर्षानुवर्षे अशा जागांवर झोपडप˜्याच ठेवून महापालिकेला शहराचे काय करायचे आहे असा प्रश्न धनकवडी येथील महापालिका प्रभाग समितीचे सदस्य ज्ञानेश्वर दारवटकर यांनी विचारला आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी हिराबाग येथील भूखंड झोपडप˜ी पुर्नवसनासाठी खासगी विकसकला देण्याचा ठराव संमत करण्यात आला. सत्ताधारी राष्ट्रवादी, काँग्रेस, विरोधातील भाजप सेना यांनी या विषयाचे समर्थन केले तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी या ठरावाला विरोध केला. दारवटकर यांनी महापालिकेच्या मालकीचा भूखंड असा खासगी बिल्डरला देण्याचे समर्थन केले आहे. महापालिकेला स्वत:ला अशा भूखडांवर गृहनिर्माण प्रकल्प सुरू करणे शक्य असले तरी तो पुर्ण करणे कधीही शक्य नाही. त्यामुळे या विषयाला विरोध करणार्‍यांना त्या जागेवर वर्षानुवर्षे झोपडप˜ीच रहावी असे वाटते का असे मत दारवटकर यांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Will the municipality keep the slum?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.